Yuzvendra Chahal Spotted With Mystery Girl: कोरिओग्राफर (Choreographer) आणि डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) आणि टीम इंडियाचा (Team India) लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. मात्र, दोघांनीही अधिकृतपणे घटस्फोट किंवा वेगळं होण्याची घोषणा केलेली नाही. अशातच सोशल मीडियावर मात्र, दोघांचा घटस्फोट होत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच युझवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला, ज्यामुळे पुन्हा एकदा युझी आणि धनश्रीमध्ये नक्कीच काहीसं बिनसलंय, अशा चर्चांनी जोर धरला आहे.
युजवेंद्र चहल मुंबईतील एका हॉटेलबाहेर एका मिस्ट्री गर्लसोबत दिसल्याचं बोललं जात आहे. द न्यू इंडियननं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, युझी बॅगी लाईट ब्लू जीन्ससह कॅज्युअल व्हाईट ओव्हरसाईज टी-शर्ट घातलेला दिसत होता. त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल दिसली, जिनं गडद हिरव्या रंगाचा ओव्हरसाईज स्वेटशर्ट वेअर केला होता.
हॉटेल बाहेर स्पॉट झाल्यानंतर युझीनं तोंड लपवलं...
व्हायरल व्हिडीओमध्ये युझवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला. पण, युझीसोबत दिसलेली ती मिस्ट्री गर्ल नेमकी कोण होती? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, एका पोर्टलनं केलेल्या दाव्यानुसार, युझवेंद्रला ज्यावेळी हॉटेलबाहेर एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट करण्यात आलं, त्यावेळी मात्र, क्रिकेटर्सनी आपलं तोंड लपवलं.
2023 मध्ये धनश्रीनं हटवलेलं स्वतःच्या नावापुढचं युझीचं आडनाव
दरम्यान, धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी 2023 मध्येही दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर आल्या होत्या. 2023 मध्ये धनश्रीनं आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन स्वतःच्या नावापुढे लावलेलं 'चहल' आडनाव हटवलं होतं. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. पण, युझी चहलनं त्यावेळी जाहीरपणे या सर्व चर्चा अफवा असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता काही दिवसांपूर्वी धनश्री आणि चहलनं एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. ज्यामुळे पुन्हा एकदा जोडप्याच्या घटस्फोट झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :