Gaurav Taneja : फ्लाइंग बीस्ट (Flying Beast) अशी ओळख असणारा यूट्यूबर गौरव तनेजाला (Gaurav Taneja) वाढदिवस साजरा करणं महागात पडलं आहे. नोएडामध्ये, कलम-144 चे उल्लंघन केल्याबद्दल काल (9 जुलै) पोलिसांनी त्याला मेट्रो स्टेशनवरून अटक केली होती.  गौररवला आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण?
गौरव तनेजा त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नोएडाच्या सेक्टर-51 मेट्रो स्टेशनवर गेला होता. मेट्रो स्टेशनला तो त्याचा वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिची त्यानं सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली होती. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला फॉलो करणारे चाहते मेट्रो स्टेशनवर त्याला भेटण्यासाठी पोहचले. तिथे गौरव आल्यानंतर गर्दी झाली. ही माहिती पोलिसांना कळाली. त्यानंतर पोलिसांनी मेट्रो स्टेशनवर जमा झालेल्या लोकांची गर्दी नियंत्रणात आणली. त्यानंतर गौरवला पोलिसांनी अटक केलं. 


गौरवनं वाढदिवस साजरा करण्यासाठी मेट्रो कोच बुक केला होता. गौरवची पत्नी रितु राठी तनेजानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं की, 1.30 वजता गौरव चाहत्यांना भेटतील पण नंतर एक स्टोरी शेअर करुन रितुनं सांगितलं की, हा कार्यक्रम काही खाजगी कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. कलम 144 चे उल्लंघन करण्यासोबतच कलम 341 आणि 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





गौरव आहे प्रसिद्ध यूट्यूबर 
अटक झाल्यानंतर गौरव सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. गौरव हा देशातील प्रसिद्ध यूट्यूबर आहे. गौरवचे एकूण तीन यूट्यूब चॅनल आहेत. फ्लाइंट बीस्ट, फिट मसल टिव्ही आणि रसभरी के पापा हे तीन यूट्यूब चॅनल त्याचे आहेत. कानपूरमध्ये जन्मलेला गौरव हा  पायलटही आहे आणि तो सध्या दिल्लीत राहतो.


हेही वाचा :