777 Charlie Ott : सध्या  दाक्षिणात्य चित्रपट जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. पुष्पा आणि आरआरआर या दाक्षिणात्य चित्रपटांनी धुमाकूळ घातला होता. '777 चार्ली' (777 Charlie) हा चित्रपट 10 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता रक्षित शेट्टीनं (Rakshit Shetty) प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या कथानक आणि कलाकांच्या अभिनायनं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 


या ओटीटीवर होणार रिलीज 
दाक्षिणात्य अभिनेता रक्षित शेट्टीचा चार्ली 777 हा चित्रपट वूट (Voot) या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 29 जुलै रोजी हा चित्रपट वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  777 चार्लीने कर्नाटकातील 100 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये 25 दिवस पूर्ण केले आहेत.  


काय आहे चित्रपटाचे कथानक?


‘777 चार्ली’ चित्रपटामध्ये ‘धर्मा’ या व्यक्तीचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. धर्मा हा एका फॅक्टरीमध्ये काम करत असतो. धर्मा हा एकटा राहात असतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात चार्लीची एन्ट्री होते. चार्ली हा एक लॅब्राडोर कुत्रा आहे. चार्लीची एन्ट्री झाल्यानंतर धर्माच्या आयुष्या जे काही घडते, ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. 777 चार्ली हे चित्रपटाचे नाव या चित्रपटातील लॅब्राडोर कुत्र्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे. 


या कलाकारांनी साकारली प्रमुख भूमिका


के किरणराज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. रक्षित शेट्टीसोबतच या चित्रपटामध्ये  संगीता शृंगेरी, राज बी शेट्टी, दानिश सैत आणि बॉबी सिम्हा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. रक्षित शेट्टी आणि जीएस गुप्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


कर्नाटकचे मुख्यमंत्री चित्रपट पाहून झाले भावूक
कर्नाटकचे बसवराज बोम्मई यांनी 777 चार्ली हा चित्रपट पाहून भावूक झाले होते. बसवराज बोम्मई यांनी पाळलेल्या कुत्र्याचे गेल्या वर्षी निधन झाले. हा चित्रपट पाहिल्यानंतर बसवराज बोम्मई यांना त्यांच्या कुत्र्याची आठवण आली, असं त्यांनी सांगितलं होतं. '777 चार्ली' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे बसवराज बोम्मई यांनी कौतुक केलं होतं.


हेही वाचा: