Yami Gautam Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)सध्या तिच्या आर्टिकल 370 या सिनेमामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच आर्टिकल 370 या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याशिवाय टिझर आणि सिनेमाच्या रिलीज डेटबाबतही घोषणा करण्यात आली आहे. सिनेमाची घोषणा करण्यात आल्यानंतर अभिनेत्री यामी गौतमने पती आणि आई समवेत दिसली होती. दरम्यान आता यामीचा लूक पाहिल्यानंतर ती प्रेग्नंट असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, या प्रेग्नंसीबाबत्या बातम्यांना यामीकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. 


यामी गौतम खरच प्रेग्नंट आहे?


यामी गौतम (Yami Gautam)  आणि आदित्य धर (Aditya Dhar) मुंबईत एकत्रित स्पॉट झाली. यावेळी यामीने गुलाबी कलरचा सूट घातलेला दिसतोय. तर दिग्दर्शक आदित्य धर पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये यामीसोबत दिसत आहेत. दोघे एकत्रित दिसले आणि यामीच्या वेगळ्याच लूकने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. यामी गौतम प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांनी जोर धरलाय. दरम्यान यामीने गुलाबी सूटच्या ओढणीला वेगळ्या अंदाजात कॅरी करताना पाहिले. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते यामी प्रेग्नंट असल्याची शक्यता वर्तवताना दिसत आहेत. यामीने ओढणीच्या सहाय्याने बेबी बंप लपवला, अशी प्रतिक्रिया चाहते व्यक्त करत आहेत. यामी गौतम सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. 


तीन वर्षांपूर्वी केला होता विवाह


अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) 2021 च्या जून महिन्यात दिग्दर्शक आदित्य धर याच्याशी गुपचूप विवाह उरकला होता. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. यामी आणि आदित्य अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. यामी गौतमच्या कारकिर्दीबाबत बोलायचे झाले तर नुकतेच तिने अक्षय कुमार ओएमजी 2 मध्ये काम केले आहे. त्यानंतर तिचा आर्टीकल 370 ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तिने 'भूत पोलीस', 'चोर निकल के भागा', 'लॉस्ट', 'दसवी, 'ए थर्सडे' अशा अनेक सिनेमात काम केले आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Big Boss 17 :'बिग बॉस 17' च्या ट्रॉफीवर कोण कोरणार? काय सांगतोय वोटिंग ट्रेंड? जाणून घ्या