Yami Gautam Box Office Collection: बॉलिवूड (Bollywood News) सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्याचे सिनेमे याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. अशातच बॉलिवूडच्या सध्याच्या टॉप अॅक्ट्रेस आलिया, प्रियांका, दीपिका यांच्या सिनेमांची चाहते अगदी आतुरतेनं वाट पाहत असतात. या अभिनेत्री सिनेमात आहेत, म्हणजे, सिनेमा हिट होणारच, असा एक समज इंडस्ट्रीत आहे. बरं या अभिनेत्रींच्या सिनेमांचं बजेट कित्येक कोटींमध्ये असतं. बिग बजेट सिनेमांसाठी कधीकधी या अभिनेत्री 'मसिहा' ठरतात.
पण, तुम्हाला माहितीय का? या बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींच्या मागून आलेली अशी एक अभिनेत्री आहे, जी सिनेमात असणं म्हणजे, तो सिनेमा हिट जाणारच. बरं या अभिनेत्रीचे अगदी लो बजेट सिनेमेही कित्येक पटींनी जास्त कमाई करतात. हे आम्ही नाही, तिच्या आजवरच्या सिनेमांच्या कमाईचे आकडे सांगतायत. आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलतोय, त्या अभिनेत्रीचं नाव यामी गौतम (Yami Gautam).
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनं नेहमीच तिच्या अभिनयानं सर्वांना प्रभावित केलंय. तिचे चाहते तिच्या अभिनयाचं कौतुक करतात आणि ती नेहमीच तिच्या भूमिकेनं लोकांच्या हृदयावर आणि मनावर कायमची छाप सोडते. यामी गौतमनं तिच्या फिल्म इंडस्ट्रीमधील कारकिर्दीची सुरुवात आयुष्मान खुरानासोबत 'विकी डोनर' या चित्रपटानं केलेली. पदार्पणापासूनच यामी गौतमचं नशीब बदललं आणि ती घराघरांत पोहोचली.
यामी गौतम तिच्या 'हक' चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. यामी आणि इमरानची ऑन स्क्रिन केमिस्ट्री लोकांना फारच आवडलीय आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही गाजलाय. यामीनं आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत बहुतेक हिट चित्रपट दिलेत. तिचा बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड पाहिला तर, तिच्या फ्लॉप सिनेमांपेक्षा तिच्या हिट सिनेमांची यादी मोठी आहे.
यामी गौतमच्या हिट फिल्म्सचं लाईफटाईम कलेक्शन
| फिल्म्स | लाईफ टाईम कलेक्शन |
| विक्की डोनर | 35.50 कोटी |
| बदलापुर | 50.7 कोटी |
| काबिल | 103.84 कोटी |
| उरी : द सर्जिकल स्ट्राईक | 245.36 कोटी |
| बाला | 116.81 कोटी |
| OMG 2 | 150.17 कोटी |
यामी गौतमचे हिट सिनेमे (Hit Movies Of Yami Gautam)
यामी गौतमनं आधी जाहिरातींमधून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. पण, त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. जाहिरातींमध्ये चमकलेल्या यामी गौतमनं आजवर अनेक सिनेमे केले. त्यापैकी काही थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले आणि काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. यामीच्या हिट चित्रपटांच्या यादीत सहा चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलंय. या यादीतलं पहिलं नाव म्हणजे, तिचा पहिला हिट सिनेमा, 'विक्की डोनर'. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर तिनं 'बदलापूर', 'काबिल', 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक', 'बाला' आणि 'ओएमजी 2' सारखे हिट सिनेमे दिले. या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.
यामी गौतमच्या फ्लॉप फिल्म्सचं लाईफटाईम कलेक्शन
| फिल्म्स | लाईफ टाईम कलेक्शन |
| टोटल सैयापा | 5.94 कोटी |
| सनम रे | 27.74 कोटी |
| जुनूनियत | 4.10 कोटी |
| सरकार 3 | 9.93 कोटी |
यामी गौतमचे फ्लॉप सिनेमे (Flop Movies Of Yami Gautam)
यामी गौतमनं आजवरच्या कारकीर्दीत फारच कमी फ्लॉप दिलेत. त्यांनी फक्त 4 फ्लॉप फिल्म्स दिल्यात. या यादीत एकूण 'सैयापा', 'सनम रे', 'जूनूनियत' आणि 'सरकार 3'चा समावेश आहे. सध्या तिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा अजून बॉक्स ऑफिसवर नोटा छापतोय. ही फिल्म 40 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाली असून या फिल्मनं आतापर्यंत फक्त 14.69 कोटींचं कलेक्शन केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :