Horoscope Today 19 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 19 नोव्हेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीविठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज एखादी गोष्ट किती मनावर घ्यायची, हे तुमच्यावरच अवलंबून राहील, तुम्हाला मिळालेले यश या सर्वांवर मात करेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज मुलांच्या आधुनिक विचारांबरोबर चालणे तुम्हाला थोडे अवघड जाईल, याबाबतीत जोडीदारावर सर्व निर्णय सोपवले तर शांतता मिळेल. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज परदेशाची व्यवसाय निमित्त केलेले व्यवहार यशस्वी होतील, सहकाऱ्यांच्या मदतीमुळे कामाचा फडशा पाडाल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज घरगुती कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घ्याल, विद्यार्थ्यांनी शॉर्टकट टाळावा 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज उगीचच कोणाशी गप्पा मारणे आज तुम्हाला आवडणार नाही, प्रत्येक वेळेचा सदुपयोग करून घ्याल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज मानापमानाच्या कल्पना टोकदार न करणं हे तुमच्याच हातात राहील, सभोवताली आनंदी वातावरण ठेवा 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याच्या स्वभावाचा अचूक अंदाज घ्याल आणि त्याप्रमाणे आपली वागणूक ठरवाल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात थोडा मानसिक त्रास झाला तरी काम चालू ठेवाल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज तुमच्या बुद्धीचा वापर जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे जास्त राहील, काही बाबतीत निष्काळजीपणा दाखवा 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज महिलांचे विचार एकांगी राहतील, दुसऱ्याला योग्य सल्ला द्याल, फक्त अतिस्पष्टवक्तेपणामुळे कोणाला दुखावू नका 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज पूर्वी जोडीदाराला दिलेली आश्वासने पाळू शकला नाहीत, त्यामुळे वादाला तोंड फुटेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज कोणत्याही तणावाच्या वातावरणात शांत बसणे योग्य ठरेल, व्यवसायात वाढ कशी करता येईल याचा ध्यास लागेल

हेही वाचा

Lakshmi Narayan Yog: आता कुठे 5 राशींना खरं सुख मिळणार! 7 दिवसांत पॉवरफुल लक्ष्मीनारायण राजयोग बनतोय, पैसा..नोकरी..लव्ह लाईफ भारी..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)