New OTT Releases This Week In Hindi 2025: नोव्हेंबर 2025 चा तिसरा आठवडा ओटीटी (OTT Relesed) प्रेक्षकांसाठी एका उत्सवापेक्षा कमी नाही. या आठवड्याच्या शेवटी, नेटफ्लिक्स (Netflix), अमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video), जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) आणि सोनी लिव्हवर (SonyLIV) अनेक प्रमुख वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movies) प्रदर्शित होणार आहेत. या ओटीटी कंटेंटमध्ये अॅक्शनपासून थ्रिलरपर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे. तुम्हाला थ्रिलर सिनेमे आवडत असतील, स्पोर्ट्स ड्रामाचे फॅन्स असाल, तर फॅमिली इमोशन्सवर आधारित कथा पाहणं आवडत असेल, तर हा आठवडा प्रत्येकासाठी खूप खास आहे. बसल्या-बसल्या तुमच्यासाठी थ्रील रोमान्स, इमोशन्स, ड्रामा आणि रियल एन्टरटेन्मेंटचा पॅकेज असेल. तर हा वीकेंड आणखी मजेदार होईल.
या आठवड्यात OTT वर नवीन काय?
1. वेब सीरिज: नाडू सेंटर
OTT: JioHotstar
20 नोव्हेंबर रोजी JioHotstar वर प्रदर्शित होणारा तमिळ स्पोर्ट्स ड्रामा 'नाडु सेंटर' ही एक रंजक कथा आहे. हा चित्रपट एका बास्केटबॉल खेळाडूभोवती फिरतो. यात शशी कुमार, कलैयारसन, आशा शरथ आणि दिल्ली गणेश यांच्या भूमिका आहेत.
2. वेब सीरिज : द फॅमिली मॅन सीझन 3
OTT: Amazon Prime Video
भारतातील सर्वात मोठी स्पाय थ्रिलर मालिका, 'द फॅमिली मॅन' तिच्या तिसऱ्या सीझनसह परतली आहे. मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत दिसणार आहेत. राज आणि डीके दिग्दर्शित ही सीरिज 21 नोव्हेंबरपासून Amazon Prime Video वर स्ट्रीम होईल. ती हिंदी, तेलुगू आणि इतर अनेक भाषांमध्ये उपलब्ध असेल.
3. सिनेमा : बायसन (Bison Kaalamaadan)
OTT: Netflix
ध्रुव विक्रम आणि अनुपमा परमेश्वरन अभिनीत 'बायसन' आता 21 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल. मारी सेल्वराज यांच्या चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूळ घातलाय. हा एक रुरल स्पोर्ट्स ड्रामा आहे, जो तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होईल.
4. सिनेमा : द बंगाल फाईल्स
OTT: Zee5
थिएटरमध्ये अपेक्षा पूर्ण न केल्यानंतर, 'द बंगाल फाइल्स' आता 21 नोव्हेंबर रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या भूमिका आहेत.
5. सिनेमा : होमबाउंड
OTT : नेटफ्लिक्स
भारताची अधिकृत ऑस्कर एन्ट्री असलेला, 'होमबाउंड' देखील 21 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे. हा चित्रपट नीरज घायवान यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
6. चित्रपट: डायनिंग विथ द कपूर्स
OTT : नेटफ्लिक्स
सर्वात प्रसिद्ध फिल्मी कुटुंबापैकी एक असलेलं कपूर कुटुंब 'डायनिंग विथ द कपूर्स' आता वेळ आणि आठवणी शेअर करण्यासाठी येत आहे. रणबीर, करीना, करिश्मा, नीतू, रणधीर आणि सैफ या विशेष शोमध्ये दिसतील. राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीला समर्पित, हा विशेष शो 21 नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.
7. वेब सीरिज : जिद्दी इश्क
OTT : जिओ हॉटस्टार
अदिती पोहनकर आणि परमब्रत चट्टोपाध्याय जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या रोमँटिक-थ्रिलर मालिकेत 'जिद्दी इश्क'मध्ये काम करतील. हा शो त्याच्या वेड्या प्रेमकथेमुळे आणि रहस्यमय कथानकामुळे चर्चेत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :