सांगली - नाट्य पंढरी सांगलीत आज जागतिक रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते नटराज व विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे पूजन पार पडले. मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला. आज कवी, लेखक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

नाट्य पंढरी म्हणून सांगलीची ओळख आहे. याच भूमीतून रंगभूमीचा जन्म झाला. विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल, बालगंधर्व, मास्टर अविनाश अश्या अनेक दिग्गजांची जन्म व कर्म भुमी असणाऱ्या या सांगलीतून मराठी नाट्य सृष्टीला नवी दिशा मिळाली. 5 नोव्हेंबर 1843 मध्ये सांगलीमध्ये विष्णुदास भावे यांनी "सीता स्वयंवर" हे पहिले मराठी नाटक सादर केले होते. तेव्हापासून मराठी नाट्य क्षेत्रात 5 नोव्हेंबर हा दिवस रंगभूमी दिन साजरा करण्याची परंपरा आहे.

आजही नटराज पूजन व नाट्यसंगीत सादर करुन ही परंपरा सांगलीकर नाट्य प्रेमी जोपासत आहेत. आज विष्णुदास भावे नाट्य मंदिर याठिकाणी हा रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्या हस्ते नटराज व विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तर या रंगभूमी दिनी विष्णुदास भावे यांचे नावे पुरस्कार देण्याची प्रथा गेल्या 54 वर्षांपासून सुरू आहे. अनेक दिग्गज कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. नाटक या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.

संबंधीत बातम्या :

आम्ही खरंच रसिक आहोत?

...तर मी नाटकात काम करणार नाही; सुबोध भावे संतापला