Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. हे दोन्ही कलाकार गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. दोघेही सुपरस्टार आहेत आणि दोघांची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. अनेक सिनेमांमधून सलमान आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. बॉलीवूडमध्ये अनेकदा असे घडले की शाहरुखने एखादा चित्रपट नाकारला आणि तो सलमानकडे गेला.तर सलमानचे नाकारलेले चित्रपटही शाहरुखपर्यंत पोहोचलेत.
असाच एक सुपरहिट सिनेमा सलमानने नाकारल्यामुळे शाहरुखकडे गेला होता. 2007 मध्ये प्रदर्शित झालेला 'चक दे इंडिया' हा त्यातीलच एक सिनेमा. हा चित्रपट यापूर्वी सलमानला ऑफर करण्यात आला होता पण त्याने तो नाकारला होता.सलमानने नकार दिल्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटासाठी शाहरुखची निवड केली. शाहरुखने या चित्रपटात काम केले होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटानंतर अनेक वर्षांनी सलमान म्हणाला होता की, शाहरुख खाननेही काही उत्तम चित्रपटांचा भाग व्हावा अशी माझी इच्छा होती.
सलमानने का सोडला सिनेमा?
सलमान त्याच्या सुपरहिट चित्रपट 'सुलतान'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना त्याला चक दे इंडिया नाकारण्याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्याने म्हटलं की, जेव्हा मला चक दे ऑफर करण्यात आली तेव्हा माझी इमेज पूर्णपणे वेगळी होती कारण मी पार्टनर आणि अशा प्रकारचे सर्व चित्रपट करत होतो. चक दे मध्ये माझी एकच गोष्ट होती की माझ्या चाहत्यांनी मी विग घालून भारतासाठी सामने जिंकावे अशी अपेक्षा करतील, जे चित्रपटासाठी योग्य नाही. त्यावेळी माझी शैली नव्हती. हा एक वेगळ्या आशयाचा सिनेमाचा होता आणि मी व्यावसायिक प्रकारचा सिनेमा करत होतो जो मी अजूनही करत आहे. मी व्यावसायिक सिनेमा क्षेत्रातून कधीही बाहेर पडणार नाही.
काय होती 'चक दे इंडिया'ची गोष्ट?
चक दे इंडिया हा इमोशनल स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट होता. यामध्ये शाहरुख खानने कबीर खान नावाच्या हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. याआधी कबीर हा हॉकीपटू होता. पाकिस्तानकडून एका सामन्यात पराभूत झाल्यानंतर कबीरवर फिक्सिंगचे आरोप झाले होते. तो हॉकी संघाचा कर्णधारही होता. गंभीर आरोप करून त्यांना हाकलून देण्यात आले. पण नंतर प्रशिक्षक असताना त्यांनी भारतीय महिला हॉकी संघाला विश्वचषक जिंकून दिला.