Aastad Kale : हल्लीची तरुण पिढी ही लिव्ह इनमध्ये राहण्याचा पर्याय निवडते. अनेक कलाकारांनी देखील हा पर्याय निवडला आहे. त्याचप्रमाणे आपल्या करिअरसाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात येतात. त्यामुळे पीजीमध्ये राहणं हा अनेकांसाठी सोईस्कर पर्याय असतो. पण अनेकदा लिव्ह-इनमध्ये राहताना किंवा पीजीमध्ये राहताना बरेच वाद आणि भांडणं होतात. अभिनेता आस्ताद काळेने (Aastad Kale) नुकतच याविषयी मत व्यक्त केलं आहे. 


आस्तादने अभिनेत्री स्वप्नाली पाटील हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. आस्ताद आणि स्वप्नालीने देखील लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहण्याचा पर्याय निवडला होता. त्यामुळे हल्लीची तरुण पिढी नवरा बायको जेव्हा एकत्र राहतात, तेव्हा रुममेट्स अशी उपमा देतात. त्यामुळे कुणाबरोबर तरी राहताना कसं अॅडजेस्ट करावं लागतं, यावर आस्तादनं त्याचं मत व्यक्त केलं आहे. आस्तादने आरपार ऑनलाईन या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. 


आस्तादने नेमकं काय म्हटलं?


आस्तादने यावर म्हटलं की, मला याचा अजिबात त्रास नाही झाला. म्हणजे तुम्ही ठरवलंत की आता लिव्ह इन मध्ये राहायचं तुम्ही निवडलेल्या व्यक्तीसोबत तर काही अलिखित नियम असतात.माणूस एकत्र असल्यावर खरा कसा आहे ते कळतो. एकत्र राहिल्यावर त्या माणसाच्या सवयी कळतात. पण हे खरंतर अवघड आहे. नवरा बायको किंवा पीजी म्हणून एकत्र राहायचं. विशेष करुन मुलींसाठी हे खूप अवघड आहे. मुलांचं काही नसतं, मुलं राहतात. फार काही वाद झाले, तर 90 टक्के मुलांची भांडणं ही ओल्ड मॉन्कवर मिटतात आणि हे खरंय. 


अशा वेळी तुमचा समजूतदारपणा दिसून येतो - आस्ताद काळे


माझ्या आजूबाजूला पाहिलेली उदाहरणं आहे. म्हणजे एक कोल्हापूरची मुलगी आणि एक नागपूरची मुलगी, या दोघी जेव्हा एकत्र राहतात, तेव्हा दोन संस्कृती वेगवेगळ्या संस्कृती आहेत, खूप मोठ्या या एकत्र नांदायला लागतात तेव्हा खटके होतात. तेव्हा तुमची विल्हपॉवर आणि मॅच्युरिटी असते. म्हणजे मी याच्यावरुन भांडणं ऐकली आहेत की, अरे चहा केला सकाळी, उघडलेली दुधाची पिशवी होती. आता चहासाठी किती दुध लागतं. त्यावर संध्याकाळी माझी रुममेट माझ्याबरोबर भांडली की माझं दुध होतं तू का वापरलं. म्हणजे या मुद्द्यावरुन रुममेट्समध्ये भांडणं होतात. यामध्ये अर्थात खूप गोष्टी असतात. त्यामुळे अश्या वेळी तुमची मॅच्युरिटी दिसून येते.


ही बातमी वाचा : 


RJ Malishka : 'फक्त लिहिला निबंध...पिझ्झाचा झाला प्रबंध'; पुण्यातील अपघातावर आरजे मलिष्काचं रॅप साँग