Yogita Chavan in Bigg Boss Marathi Season 5 : अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) ही कलर्स मराठी वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता तिने बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) ग्रँड एन्ट्री केली आहे. तिच्या एन्ट्रीमुळे चाहत्यांना देखील सुखद धक्का बसला आहे. तसेच पुन्हा एकदा कलर्स मराठी वाहिनीवर योगिताने एन्ट्री घेतली आहे.
काही दिवसांपूर्वीच योगिताने तिचा सहकलाकार सौरभ चौघुलेसोबत लग्नगाठ बांधली होती. आता ती बिग बॉसच्या घरात कसा खेळ खेळणार याकडेही सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. तिचा खेळ पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.
कोण आहे योगिता चव्हाण?
योगिता हा कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये तिने अंतरा ही भूमिका साकारली. तिची ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरली होती. तिच्या या भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घरांघरात पोहचली.त्यानंतर ती राडा या सिनेमात देखील झळकली होती. आता ती बिग बॉसच्या घरातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
योगिताने बांधली लग्नगाठ
योगिता आणि सौरभ यांचा विवाहसोहळ 3 मार्च रोजी पार पडला. नातेवाईक आणि मित्र मैत्रीणींच्या उपस्थितीत योगिता आणि सौरभच्या लग्नसोहळा संपन्न झाला. योगिताने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकार मंडळींनी देखील कमेंट्स करत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लग्नाला अवघे काही महिनेच झाले असताना योगिता आणि सौरभ या दोघांनी त्यांच्या हक्काचं नवं घरंही नुकतच खरेदी केलं आहे.
रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार
काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता रितेश स्पर्धकांची शाळा कशी घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. तसेच घरात कोणते टास्क होणार याचीही उत्सुकता आहे. कारण बिग बॉसची यंदाची थीम ही चक्रव्यूह अशी आहे. त्यामुळे स्पर्धक हे चक्रव्यूहात अडकणार आहेत.