Who Is Rukmini Vasant In Kantara Chapter 1: साऊथ सुपरस्टार (South Superstar) ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) बहुप्रतिक्षित सिनेमा 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) अखेर बॉक्स ऑफिसवर (Box Office) रिलीज झाला असून सगळीकडे सिनेमाच्याच चर्चा रंगल्या आहेत. 'कांतारा चॅप्टर 1'ची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये या सिनेमाची चर्चा रंगलेली. त्यानंतर सिनेमाचा टीझर आला आणि नंतर ट्रेलर... अखेर सिनेमा रिलीज झाला असून सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच सध्या सिनेमात झळकलेल्या राजकुमारीबाबत सर्वांना कुतुहल निर्माण झालंय. ती म्हणजे, या सिनेमाची हिरोईन साऊथ सेन्सेशन रुक्मिणी वसंत.  

Continues below advertisement


सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सर्वांच्या मनात तिच्याबद्दल कुतूहल निर्माण झालेलं. अखेर सिनेमा रिलीज झाल्यानंतरही तिच्याच चर्चा रंगल्या आहेत. राजकुमारी कनकवतीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. रुक्मिणी वसंत साऊथ सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक... पण, बॉलिवूडमध्ये मात्र यापूर्वी तिची कधीच चर्चा झाली नव्हती. जाणून घेऊयात, सिनेमाची हिरोईन रुक्मिणी वसंत हिच्याबाबत सविस्तर... 


रुक्मिणी वसंत कोण? 


रुक्मिणी कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करते. तिनं 2019 च्या 'बिरबल ट्रायलॉजी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दरम्यान, 2023 च्या रोमँटिक ड्रामा 'सप्त सागरदाता एलो'द्वारे तिला प्रसिद्धी मिळाली. तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. रुक्मिणीनं 'बघीरा' या चित्रपटातही उत्कृष्ट अभिनय केलेला.






सैन्यदलात होते रुक्मिणीचे वडील  


रुक्मिणी वसंतचे वडील सैन्यदलात होते. ती एका कन्नड कुटुंबात वाढली. ती शहीद कर्नल वसंत वेणुगोपाल यांची मुलगी आहे. तिचे वडील कर्नाटकातील अशोक चक्र प्राप्त करणारे पहिले व्यक्ती होते. 2007 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील उरी येथील भारत-पाकिस्तान सीम ओलांडताना घुसखोरांना रोखताना ते शहीद झालेले.  रुक्मिणीची आई सुभाषिनी वसंत ही भरतनाट्यम नृत्यांगना असून कर्नाटकातील शहीद सैनिकांच्या विधवांना आधार देण्यासाठी एक फाउंडेशन चालवतात.


कांतारा हा एक खास चित्रपट आहे : रुक्मिणी वसंत 


रुक्मिणीनं लंडनमधून अभिनयाची पदवी मिळवली. फार कमी लोकांना माहिती असेल की, या अभिनेत्रीनं 'अपस्टार्ट्स' या हिंदी चित्रपटात काम केलंय. तिला दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आशादायक अभिनेत्रींपैकी एक मानलं जातं. 'कांतारा'मध्ये काम केल्यानं तिच्या कारकिर्दीला नक्कीच चालना मिळेल. एका मुलाखतीत तिनं सांगितलं की, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटात राजकुमारी कनकवतीची भूमिका तिच्यासाठी खास आहे. तिच्या आयुष्यात तिला मिळणाऱ्या सर्वात खास भूमिकांपैकी ही एक आहे. अभिनेत्रीच्या आगामी प्रकल्पांमध्ये टॉक्सिक आणि ड्रॅगन सारखे चित्रपट समाविष्ट आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kantara Chapter 1 First Review Out: ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1'चा फर्स्ट रिव्यू समोर, पाहायच्या आधीच जाणून घ्या कशीय फिल्म?