Kantara Chapter 1 First Review: ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कांतारा: अ लेजेंड - चॅप्टर 1' 2 ऑक्टोबर 2025 म्हणजेच, आज दसऱ्याच्या मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. अशातच सिनेमाचा फर्स्ट रिव्यू समोर आला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, प्रीमियर शो आधीच झाला आहे. अशातच ऋषभ शेट्टीचा सिनेमा कसा आहे? सविस्तर जाणून घेऊयात...

Continues below advertisement

'कांतारा चॅप्टर 1'चा फर्स्ट रिव्यू समोर, नेमका कसा आहे चित्रपट? (Kantara Chapter 1 First Review)

'कांतारा चॅप्टर 1'च्या प्रदर्शनापूर्वी एका तेलुगू वेबसाइटवर एक फर्स्ट रिव्यू व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हा सिनेमा नक्की पाहा, असं नमूद करण्यात आलेलं. त्यात असंही म्हटलंय की, 'कांतारा चॅप्टर 1' सर्व अपेक्षा पूर्ण करतो.  

खरं तर, तेलुगू फिल्मीफोकसच्या एका रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1'च्या प्रेक्षकांनी चित्रपटाच्या सादरीकरणाचं कौतुक केलं आहे आणि ते 'कांतारा पेक्षाही अधिक नेत्रदीपक' असल्याचं म्हटलं आहे. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, 'कांतारा चॅप्टर 1' उत्कृष्ट आहे आणि पहिल्या भागात उपस्थित केलेले सर्व प्रश्न दुसऱ्या भागात स्पष्ट करण्यात आले आहेत...! खरंच खूपच भव्य, शानदार आहे." चित्रपटाच्या टेक्निकल बाबींचीही खूप प्रशंसा करण्यात आली. प्रेक्षकांनी म्युझिक, बॅकग्राउंड स्कोर आणि सिनेमेटोग्राफी 'उत्कृष्ट' म्हणून प्रशंसा केली आहे.

Continues below advertisement

'कांतारा चॅप्टर 1' सर्व अपेक्षांवर पाणी फेरणार? (Kantara Chapter 1 First Review)

'कांतारा चॅप्टर 1'ला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. चित्रपट समीक्षक उमैर संधू यांनी ट्विटरवर आपलं मत पोस्ट केलंय आणि लिहिलंय की, "फर्स्ट रिव्यू : कांतारा चॅप्टर 1! प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसते! एक ओवररेटेड  आणि विचित्र चित्रपट..." दरम्यान, अद्याप फारसे रिव्यू उपलब्ध नाहीत, म्हणून 2 ऑक्टोबरला ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचं रियल रेटिंग पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अॅडव्हान्स बुकिंगनं मोडले सर्व रेकॉर्ड्स (Kantara Chapter 1 Advance Booking Collection)

'कांतारा चॅप्टर 1'साठी रिलीजपूर्वीच एक्सायटमेंट शिगेला पोहोचली आहे. मनी कंट्रोलच्या मते, रविवारी आगाऊ बुकिंग सुरू झालं आणि एका दिवसांत, चित्रपटानं 1.7 लाखांहून अधिक तिकिटं विकली, ज्यामुळे विक्रीपूर्वीच 5.7 कोटींची प्रीसेल कमाई केली. दरम्यान, 2022मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा'नं पहिल्या दिवशी फक्त 2 कोटी रुपये कमावलेले. खरं तर, 'कांतारा चॅप्टर 1'नं आधीच हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआरच्या 'वॉर 2' आणि पवन कल्याणच्या 'दे कॉल हिम ओजी'सारख्या मोठ्या चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगला मागे टाकलंय

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rishab Shetty Fees For Kantara Chapter 1: 'कांतारा चॅप्टर 1'साठी ऋषभ शेट्टीनं किती मानधन घेतलं? अभिनेत्याच्या फीबाबत आश्चर्यचकीत करणारा खुलासा