Prajakta Mali Crush: मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना तिच्या प्रेमविषयक आणि लग्नाविषयीच्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असतं. याच पार्श्वभूमीवर तिने एका मुलाखतीत आपल्या क्रशबद्दल आणि तिला कोण आवडतं याबाबतचा खुलासा केलेला आहे.

Continues below advertisement

प्राजक्ताचा ‘क्रश’ कोण?

एका विशेष मुलाखतीमध्ये प्राजक्ताने आपल्या मनातील भावना स्पष्ट करत सांगितलं की, बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर हाच तिचा क्रश आहे. ती म्हणाली, "रणबीरकडे पाहिलं की नेहमीच प्रेमात असल्यासारखं वाटतं." तसेच, तिला मराठी अभिनेता वैभव तत्ववादी हाही खूप आवडतो, पण रणबीर कपूरबद्दलची तिची भावना अधिक खास असल्याचं तिने सांगितलं. 'मी कायमच त्याच्या प्रेमात असते', असंही ती पुढे म्हणाली होती.

रणबीरमध्ये काय विशेष वाटतं?

रणबीर कपूरबद्दल तिच्या विशेष भावना स्पष्ट करताना प्राजक्ताने सांगितलं की, रणबीर सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नाही. तो त्याचं खासगी आयुष्य शेअर करत नाही. त्याने एकदा सांगितलं होतं की, जर मी माझं संपूर्ण आयुष्य सोशल मीडियावर टाकलं, तर माझ्या सिनेमातील व्यक्तिरेखांवर परिणाम होईल. मला ते खूप आवडलं. तसेच, दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता नानी आणि जयम रवी हे देखील तिच्या आवडीच्या यादीत असल्याचं तिने सांगितलं आहे. प्राजक्ता सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून चित्रपट आणि हास्य जत्रेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Continues below advertisement

रणबीर कपूरबाबत नेमकं काय म्हणाली प्राजक्ता?

रणबीरमधील कोणती गोष्ट प्राजक्ताला सर्वात जास्त आवडते याबद्दलही बोलताना ती म्हणाली होती की, "रणबीर मला खूप आवडतो. तो सोशल मीडियावर फार अॅक्टीव देखील नाही. तो त्याचं वैयक्तिक आयुष्य सोशल मिडियावरती शेअर करत नाही. त्याच्या आसपासच्या लोकांकडून त्याचं सोशल आयुष्य आपल्याला दिसतं. त्याने एका मुलाखतीत खूप चांगला मुद्दा मांडला होता की, जर मी माझं आयुष्य सोशल मीडियावर टाकलं तर त्याचा परिणाम मी सिनेमात ज्या भूमिका साकारतोय त्यावर होईल. मी कसा आहे हे लोकांना कळलंच नाही पाहिजे, म्हणजे सिनेमात मी जे दिसतो ते लोकांना स्वीकारायला सोपं जाईल. मला ते खूप आवडलं. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात ते कळणं किंवा सतत दिसत राहणं या गोष्टी मारक ठरतात", असं म्हणत तिने त्याचं तोंडभरून कौतुकही केलं होतं.