Bigg Boss 16 Winner MC Stan : 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) विजेतेपदावर एमसी स्टॅनचं (MC Stan) नाव कोरलं आहे. पुणेकर असलेल्या एमसी स्टॅनचं (Bigg Boss 16 Winner MC Stan) खरं नाव अल्ताफ शेख (Altaf Shaikh) असं आहे. त्याला बालपणीच संगीताची गोडी लागली. त्याने लोकप्रिय रॅपर रफ्तारसोबतही गाणं गायलं आहे. पण 'वाता' या गाण्यामुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. या गाण्याला युट्यूबवर 21 मिलियन व्हू्यूज मिळाले आहेत. 


कोट्यवधींचा मालक एमसी स्टॅन!


23 वर्षीय एमसी स्टॅन कोट्यवधींचा मालक आहे. गाणी, युट्यूब आणि कॉन्सर्टच्या माध्यमातून तो दर महिन्याला लाखो रुपये कमावतो. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या एमसीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. कुटुंबियांनीदेखील त्याला त्याच्या गाण्यांमुळे टोमणे मारले आहेत. पण तरीही त्याने त्याची आवड जोपासली. आज त्याची गाणी लोकप्रिय झाली असून तो सध्या एक प्रसिद्ध रॅपर आहे.


एमसी स्टॅनचा प्रवास... (MC Stan Struggle)


एमसी स्टॅनने वयाच्या 12 व्या वर्षी कव्वालीच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं. तसेच 'समझ मेरी बात को' या गाण्याच्या माध्यमातून त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर त्याचे 'अस्तगफिरुल्ला' (Astaghfirullah) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याच्या माध्यमातून त्याने त्याचा संघर्ष, आयुष्यात आलेल्या आर्थिक अडचणी आणि भूतकाळावर भाष्य केलं. या गाण्यामुळे एमसी स्टॅनकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला. 'तडीपार' या अल्बममुळे एमसी स्टॅन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला. 


गर्लफ्रेंडमुळे अडचणीत आलेला एमसी स्टॅन...


एमसी स्टॅनवर काही महिन्यांपूर्वी प्रचंड टीका झाली होती. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने म्हणजे औझमा शेखने त्याच्यावर आरोप केले होते. या आरोपात ती म्हणाली होती,"एमसी स्टॅनने माझ्या मॅनेजरला मला मारहाण करण्यास सांगितले आहे". या आरोपांचा एमसी स्टॅनच्या इमेजवर परिणाम झाला होता. त्यामुळेच त्याने बिग बॉसचा खेळ खेळण्याचं ठरवलं. एमसी स्टेन सध्या अनम शेख नावाच्या मुलीसोबत रिलेशनमध्ये आहे.






एमसी स्टॅन एक रॅपर म्हणून लोकप्रिय असण्यासोबत त्याचे नेकपीस आणि शूजदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. 'बिग बॉस 16'च्या प्रीमियरला तो 70 लाख किंमत असलेला नेकपीस आणि 80 हजार रुपयांचा शूज घालून आला होता. गेल्या तीन-चार वर्षांत त्याने नाव आणि खूप पैसा कमावला आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 16: एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता