Bigg Boss 16 Grand Finale Live: एमसी स्टॅन ठरला 'बिग बॉस 16'चा विजेता

शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakarey), एमसी स्टॅन (MC Stan) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस-16 चे फायनलिस्ट आहेत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 13 Feb 2023 12:05 AM
Bigg Boss 16: शिव ठाकरेनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Bigg Boss 16: शिव ठाकरे हा बिग बॉस-16 चा विजेता ठरला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 

Bigg Boss16: रितेश देशमुखचं खास ट्वीट; केलं सनी देओलचं कौतुक

Bigg Boss16: बिग बॉसचा 16 वा सिझनच्या ग्रँड फिनालेमध्ये सनी देओलनं हजेरी लावली. सनी देओलचं कौतुक करत रितेशनं खास ट्वीट सोशल मीडियावर शेअर केलं 





Bigg Boss 16 : अब्दु रोझिककडून आमिषा पटेलला ताजमहालाची प्रतिकृती भेट

Bigg Boss 16 : 'बिग बॉस'च्या मंचावर अब्दु रोझिक गदर मधील मुख्य भूमिका असलेल्या ताराच्या वेशात आला. यावेळी त्याने आमिषा पटेलला ताजमहालाची प्रतिकृती भेट म्हणून दिली. 




 

Bigg Boss 16 : एमसी स्टॅन बिग बॉस-16 मधून आऊट? कोण ठरणार विजेता

Bigg Boss 16 : टॉप-3 स्पर्धकांपैकी एक असणारा एमसी स्टॅन हा बिग बॉस-16 मधून आऊट झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. एमसी स्टॅनच्या बिग बॉस-16 च्या घरातील डायलॉग्सला तसेच त्याच्या हटके स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 

Bigg Boss 16 : 'गदर 2' चित्रपटाची टीम 'बिग बॉस'च्या मंचावर

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' चा महाअंतिम सोहळा रंगत चालला आहे. या मंचाची शोभा अधिक वाढवण्यासाठी गदर 2 चित्रपटाची टीम म्हणजेच सनी देओल आणि आमिषा पटेल आले आहेत. यावेळी त्यांनी शो चा होस्ट सलमान खानबरोबर 'यारा ओ यारा' या गाण्यावर हूकस्टेप केली.  




 

Bigg Boss 16 : कृष्णा अभिषेक आणि भारतीनं केली शालिन आणि टीनाची मिमिक्री

Bigg Boss 16 : बिग बॉस-16 मध्ये अभिषेक आणि भारती यांनी शालिन आणि टीनाची मिमिक्री केली. त्यांची मिमिक्री पाहून बिग बॉसच्या घरातील स्पर्धक खळखळून हसले.

Archana Gautam: अर्चना गौतम झाली आऊट; आता शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि प्रियांकामध्ये चुरशीची लढत

अभिनेत्री अर्चना गौतम ही बिग बॉस-16 मधून आऊट झाली आहे. आता शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि प्रियांका यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. 

Bigg Boss 16 Finale: 'हक से मंडली'चा ग्रँड फिनालेमध्ये खास परफॉर्मन्स

Bigg Boss 16 Finale:  'हक से मंडली' ही टीम बिग बॉस-16 च्या ग्रँड फिनालेमध्ये खास परफॉर्मन्स करणार आहेत. 





Shalin Bhanot: शालीन भनोट झाला आऊट

 Shalin Bhanot:  टॉप-5 मधील स्पर्धक शालीन भनोट हा बिग बॉस-16 मधून आऊट झाला आहे. आता बिग बॉस-16 च्या प्राइज मनीमध्ये देखील वाढ झाली आहे. बिग बॉसच्या विजेत्याला  31 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. 

Bigg Boss 16 Grand Finale : प्रियांका आणि अंकितची रोमॅंटिक केमिस्ट्री पुन्हा दिसणार

Bigg Boss 16 Grand Finale : 'बिग बॉस 16' च्या फिनालेसाठी फक्त काही तास शिल्लक आहेत. हळूहळू फिनालेचे काही प्रोमोज समोर येत आहेत. अलीकडेच, शोच्या अंतिम फेरीतील फायनालिस्ट प्रियांका चहर चौधरीचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिचा खास मित्र अंकितबरोबर डान्स करताना दिसतेय.






 

Bigg Boss 16 Finale: 'या' सेलिब्रिटींचा शिव ठाकरेला सपोर्ट; 'आपला माणूस' जिंकणार का?

Bigg Boss 16 Finale: प्रिन्स नरुला, शहनाज गिल, रुबिना दिलैक या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे.









Bigg Boss 16 Grand Finale : काम्या पंजाबीकडून 'बिग बॉस 16' च्या स्पर्धकांना शुभेच्छा

Bigg Boss 16 Grand Finale : काम्या पंजाबीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आता एक आठवडा झाला मी बिग बॉस पाहत नाहीये. पण, मला खात्री आहे की काहीचं बदललं नसणार आहे. कारण कदाचित ही पहिलीच वेळ आहे की ट्रॉफीसाठी कोण अधिक पात्र आहे हे ठरवणे इतकं अवघड आहे. शिव ठाकरे, एसी स्टॅन किंवा प्रियांका चौधरी कोण भाग्यवान आहे ते पाहूया... सर्वांना शुभेच्छा."


 

Bigg Boss 16 Grand Finale : शिव ठाकरे आणि प्रियांकाचा ग्रॅंड फिनालेसाठी जबरदस्त परफॉर्मन्स; दोघांमध्ये चुरशीची लढत

Bigg Boss 16 Grand Finale : बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात आज शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी पुन्हा एकदा आमनेसामने दिसणार आहेत. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे. या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. 


 



Bigg Boss 16: मंडलीचा ग्रँड परफॉर्मन्स; पाहा प्रोमो

Bigg Boss 16: कलर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बिग बॉस-16 मधील मंडली हा ग्रुप ग्रँड परफॉर्मन्स करणार आहे. पाहा व्हिडीओ:





Bigg Boss 16 Grand Finale: बिग बॉस-16 चा फायनलिस्ट एमसी स्टॅनचं खरं नाव माहितीये? या गाण्यामुळे मिळाली लोकप्रियता

Bigg Boss 16 Grand Finale:  शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakarey), एमसी स्टॅन (MC Stan) आणि प्रियांका चाहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस-16 चे फायनलिस्ट आहेत. यामधील एमसी स्टॅनचं खरं नाव  अल्ताफ शेख असं आहे. तो पुण्यामध्ये राहतो. तसेच त्याला  'वाटा' या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 


 

पार्श्वभूमी

Bigg Boss 16 Grand Finale Live:  बिग बॉस 16 चा विजेता कोण, ही प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. बिग बॉसचे चाहते सीझन 16 च्या फिनालेसाठी खूप उत्सुक आहेत. शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakarey), एमसी स्टॅन (MC Stan) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस-16 चे फायनलिस्ट आहेत. यामधील कोणत्या स्पर्धक हा बिग बॉसचा विजेता ठरणार आहे? या प्रश्नाचं उत्तर बिग बॉसच्या चाहत्यांना मिळणार आहे. आज रात्री विजेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. 


'बिग बॉस 16'च्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल


'बिग बॉस'च्या या अतरंगी पर्वाचा विजेता शिव, अर्चना, प्रियांका, एमसी स्टॅन नसून 'बिग बॉस' स्वत: आहे. हे पर्व यशस्वी होण्यामागे बिग बॉसचा मोलाचा वाटा आहे. बिग बॉस स्वत: खेळणार यंदाचं पर्व असं म्हणत या पर्वाची घोषणा करण्यात आली होती. पण खेळ जसा पुढे गेला तसा या वाक्याचा अर्थ प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने कळला. स्पर्धकांमधील भांडण, वाद, टास्क आणि बिग बॉसची हटके खेळी या सर्व गोष्टींमुळे यंदाचं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. टीआरपीच्या शर्यतीतदेखील 'बिग बॉस 16'ने बाजी मारली आहे.


पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'चा दबदबा


'बिग बॉस' हिंदीचे 15 सीझन आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले असले तरी 16 वं पर्व मात्र वेगळं ठरलं आहे. 16 वं वरीस धोक्याचं असल्याप्रमाणे 'बिग बॉस'चं 16 वं पर्वदेखील स्पर्धकांसाठी धोक्याचं ठरू शकतं. 'बिग बॉस' घरातील प्रत्येक कामात तसेच सदस्यांना गरज असेल तेव्हा त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे एक चांगला खेळाडू म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे खेळ कसा बदलणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 


'बिग बॉस 16'मध्ये 'मंडली'ची चर्चा


'बिग बॉस 16'मध्ये 'मंडली'ने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. सिने-निर्माता साजिद खानने मंडलीची निर्मिती केली होती. आता या मंडलीतील सहा सदस्यांपैकी शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोनच स्पर्धक 'टॉप 5'मध्ये पोहोचले आहेत. तर दुसरीकडे शालिन, प्रियांका आणि अर्चनाने आपल्या उत्तम खेळीने बिग बॉसच्या घरात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आता या पर्वाची ट्रॉफी कोणाला मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. 


'हा' आहे बिग बॉस 16 चा विजेता?


बिग बॉस 16 चा विजेता कोण, ही प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. बिग बॉसचे चाहते सीझन 16 च्या फिनालेसाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान, बिग बॉसच्या स्पर्धकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. प्रियांका चहर चौधरीचा बिग बॉस ट्रॉफीसोबतचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तर, दुसरीकडे शिव ठाकरे जिंकल्याच्याही पोस्ट चर्चेत यासोबतच एमसी स्टॅनचा बिग बॉसच्या ट्राफीसोबतचा फोटोही जोरदार चर्चेत आहे. दरम्यान, यावरून प्रेक्षकांनी कोणताही निष्कर्ष काढू नये, कारण बिग बॉसचा अंतिम सोहळा आज रात्री पार पडणार आहे. बिग बॉस 16 चा फिनाले अजून झालेला नाही. आज रात्री विजेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. 





- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.