Foods For Kids : मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना योग्य प्रमाणात पोषण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक मुलं सकाळी उठून काही तरी हेल्दी खाण्याऐवजी अनहेल्दी अन्न खाऊ लागतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात. अशी काही मुलं आहेत जी नीट जेवत नाहीत किंवा तासनतास उपाशी राहतात. या सवयी त्यांना फार महागात पडू शकतात. म्हणूनच पालकांनी मुलांच्या खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कारण लहानपणी मुलांना जर योग्य आहार दिला तर त्यांची तब्येत सुधारते आणि ते फिट राहतात. 


मुलांना निरोगी आणि उत्साही ठेवण्यासाठी त्यांना पोषक आहार देणे आवश्यक आहे. येथे आम्ही अशा पाच खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे मुलांना रिकाम्या पोटी खायला हवे.


मुलांनी रिकाम्या पोटी या 5 गोष्टी खाव्यात


1. बदाम : बदाम शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात लोह, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई इत्यादी आवश्यक पोषक तत्वांचा समावेश आहे. बदाम खाल्ल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते. शरीरही निरोगी राहते. बदाम खाल्ल्याने मुलांची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.


2. केळी : केळीमध्ये कार्बोहायड्रेट, लोह, सोडियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. जर तुमचे मूल बारीक असेल तर तुम्ही त्याला रोज सकाळी रिकाम्या पोटी केळी खायला देऊ शकता. कारण सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने त्यांचे वजन वाढू शकते. याशिवाय त्यांची हाडेही मजबूत होतात आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. 


3. सफरचंद : सफरचंदांमध्ये कॅल्शियम, लोह, जस्त आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. मुलांना रोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि दृष्टीही सुधारते. 


4. कोमट पाणी : प्रत्येकाने सकाळी सर्वात आधी कोमट पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे, मग ते लहान असो वा प्रौढ व्यक्ती. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी दिल्यास मुले निरोगी राहतात आणि हवामानाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. कोमट पाणी आपल्या शरीरातील नको असलेले पदार्थ किंवा नुकसानकारक पदार्थ बाहेर काढून टाकतात. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल