Shraddha Kapoor Reacts to Marriage Question: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अनेक कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर, कधी व्यावसायिक आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. 2026मध्ये ती हिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्रद्धा सध्या  प्रोफेशनल नसून,  वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा बऱ्याच काळापासून लेखक राहुल मोदीला डेट करत असल्याची माहिती आहे.  दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र दिसले.  पण त्यांनी अद्याप त्यांच्या नात्याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. दरम्यान, श्रद्धा नेमकं कधी लग्न करणार? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. त्यांची प्रेमकहाणी  लग्नापर्यंत कधी पोहोचेल?  हे दोन्ही प्रश्न नेटकऱ्यांकडून वारंवार विचारला जात आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामवर एका चाहत्याने तिला लग्न नेमकं कधी करणार? हा प्रश्न विचारला. या प्रश्नावर तिनं भन्नाट उत्तर दिलं.

Continues below advertisement

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.  ती दैनंदिन आयुष्याशी निगडीत पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.  दरम्यान, तिला एका नेटकऱ्याने पोस्टच्या कमेंटद्वारे लग्न कधी करणार?  असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर तिनं भन्नाट उत्तर दिलं.  यामुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.  खरंतर श्रद्धा कपूरने तिच्या ज्वेलरी ब्रँड, पल्मोनासची जाहिरात करताना इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये ती सुंदर दागिने परिधान करताना दिसली. 

श्रद्धा नक्की कधी लग्न करणार?

चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.  एका चाहत्याने श्रद्धाच्या पोस्टवर भन्नाट कमेंट केली.  एका चाहत्याने कमेंटद्वारे विचारले की, "तू कधी लग्न करणार?" चाहत्याच्या या प्रश्नावर श्रद्धाने भन्नाट प्रतिक्रिया दिली, "मी लग्न करेन..मी लग्न करेन..", अशी तिनं कमेंटला रिप्लाय दिलं. त्यामुळे श्रद्धा लवकरच विवाहबंधनात अडकणार का?  असा प्रश्न निर्माण होत आहे.

2026मध्ये सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या येणार भेटीला

श्रद्धा कपूर लवकरच सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  2024मध्ये श्रद्धा स्त्री 2 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला.  ती लवकरच डान्स बायोपिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच बहुप्रतिक्षित नागिन या  चित्रपटातूनही ती  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?