Imtiaz Jaleel on BJP Alliance MIM And Congress: अकोटमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल (BJP MIM Alliance Akot Nagarparishad) मलाकाहीही माहिती नाही. मी तेथील प्रभारींना लिखित माहिती मागवली आहे. दहा मिनिटांमध्ये माहिती देण्याचं त्यांना सांगितला आहे, त्यामुळे माहितीघेतल्यावरमीसंदर्भात सविस्तर बोलणार. मात्रकुठलीहीआघाडी-युतीझालीतरीआम्ही भाजपसोबतजाणारनाही, भाजपच्या विरोधात आमचे राजकारण आहे आणि ते कायम राहणार, अशीप्रतिक्रिया AIMIM चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिलीआहे.
Imtiaz Jaleel : कुठल्यास्थरावरनिर्णयघेण्यातआलाय, माहितीघेऊनकारवाईकरू
विदर्भाचीसर्वजबाबदारीआम्हीआमच्या पक्षाचेवरिष्ठनेतेआणि प्रभारींवरसोपवलीआहे. तिकीटकुणालाद्यायचं, निवडूनआल्यानंतरकायकरायचंकिंवास्थानिककाहीराजकारणअसेल त्या बाबतत्यांनाआम्हीअधिकारदिलेहोते. मात्रएवढ्यामोठ्यानिर्णयातत्यांनीपक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबतचर्चाअथवामाहितीदेणंअपेक्षितहोतं. म्हणूनचआताआम्हीयासंदर्भातलिखितमाहितीमागितलीआहे. कुठल्यास्थरावरहेनिर्णयघेण्यातआलाय, हिमाहितीघेऊनआम्हीयासंदर्भातकारवाईकरू, अशीमाहितीही इम्तियाज जलील यांनीदिली. तरपक्षाचेसर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीदेखीलनाराजीव्यक्तकेल्याचेतेम्हणाले.
Imtiaz Jaleel : मुस्लिम बहुल भागातच विरोध; इम्तियाज जलील यांनादाखवलेकाळेझेंडे
दरम्यान, 2014 पासून मराठवाड्यात पाय रोवणाऱ्या, मुस्लिम बहुल भागात वर्चस्व असणाऱ्या आणि मुस्लिम बहुल भागामध्ये एकतर्फी विजय मिळवणाऱ्या एमआयएमला छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम बहुल भागातच विरोध होऊ लागला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बाईजीपुरा भागांमध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे पदयात्रा काढताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांना पदयात्रा वळवून दुसऱ्या गल्लीत घेऊन जावी लागली. त्यानंतरही काळे झेंडे दाखवणारे आणि विरोध करणारे लोक त्यांच्या मागे काळे झेंडे घेऊन फिरत होते. ज्यांनी दहा-बारा वर्ष एमआयएमसाठी काम केलं, त्यांना तिकीट दिले नाही म्हणून लोक विरोध करीत असल्याची प्रतिक्रिया बंडखोरी केलेल्या आणि काँग्रेसमधून पुरस्कृत उमेदवाराचे म्हणणे आहे. तर इम्तियाज जलील यांनी सोळा तारखेला हा विरोध कळेल, अशी प्रतिक्रिया दिलीय.
अकोट नगरपरिषदेत नेमकं काय घडलं? (Akot Nagarparishad BJP)
अकोट नगरपरिषदेत भाजपने चक्क एमआयएमला सत्तेसाठी सोबत घेतलं. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर या नव्या आघाडीचे गटनेते असणार आहेत. या आघाडीतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आता भाजपचा 'व्हिप' पाळावा लागणार आहे. 13 जानेवारीला होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करतील. अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या, मात्र 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत नव्हतं. भाजपला सर्वाधिक म्हणजे 11 जागा मिळाल्या तर एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे 5 जागा मिळाल्या. त्यामुळे बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने चक्क एमआयएमशी हातमिळवणी केली.
Akot Election : अकोट नगरपालिकेतील पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 35
निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार)
पक्षीय बलाबल :
भाजप : 11
काँग्रेस : 06
शिंदेसेना : 01
उबाठा : 02
वंचित : 02
अजित पवार राष्ट्रवादी : 02
शरद पवार राष्ट्रवादी : 01
प्रहार : 03
एमआयएम : 05
Akot Election : भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या 'अकोट विकास मंचा'चे पक्षीय बलाबल :
भाजप : 11
एमआयएम : 05
शिंदेसेना : 01
उबाठा : 02
अजित पवार राष्ट्रवादी : 02
शरद पवार राष्ट्रवादी : 01
प्रहार : 03
--------------------------------------------
एकूण 25
इतर महत्वाच्या बातम्या
