मुंबई : बॉलिवुडमध्ये 80 आणि 90 च्या दशकात अशा काही अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली. काही अभिनेत्रींनी मोजकेच चित्रपट केले पण आजही त्यांचं चाहत्यांच्या मनातील स्थान अढळ आहे. अशाच काही अभिनेत्रींमध्ये फराह नाज या हिरोईनचं नाव प्राधान्याने घेतलं जातं. या अभिनेत्रीने मोजकेच चित्रपट केले. विशेष म्हणजे यातील बरेच चित्रपट हिट ठरले. त्यानंतर या अभिनेत्रीने सिनेसृष्टीला रामराम केला. या अभिनेत्रीने चंकी पाडेला रागाच्या भरात कानशिलात लागवली होती. विशेष म्हणजे तिचे अनिल कपूरसोबतही भांडण होते.
फराह नाज ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगीलच सक्रिय आहे. ती तिच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय? हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सांगत असते. अभिनय क्षेत्रात सक्रिय असताना ती चांगलीच वादग्रस्त राहिलेली आहे. लग्नानंतर मात्र तिने सिनेसृष्टीला रामरम केला.
फराह नाजने कोणकोणते चित्रपट केले?
फराह नाजने अनेक हिट चित्रपटांत काम केले. जमाल अली हाशमी आणि रिजवाना या दाम्पत्याचं फराह नाज हे पहिलं आपत्य आहे. दिग्गज अभिनेत्री तब्बू ही फराह नाजची बहीण आहे. फराहन नाजचा जन्म हैदरबादमध्ये एका मुस्लीम परिवारात झाला. पुढे फराहचे आई-वडील विभक्त झाले.शबाना आझमी, तनवी आझमी, बाबा आझमी हे फराह नाजचे नातेवाईक आहेत. 1985 साली फराह नाजने यश चोप्रा यांच्या फासले या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवुडमध्ये डेब्यू केला.
1986 साली फराह नाजचे ‘लव 86’ आणि ‘नसीब अपना-अपना’ असे दोन चित्रपट आले. हे दोन्ही चित्रपट चांगलेच हिट ठरले. त्यानंतर फराह नाजचे ‘ईमानदार’, ‘यतीम’, ‘घर घर की कहानी’, ‘रखवाला’, ‘जवानी जिंदाबाद’, ‘अचानक’ आणि ‘हलचल’ असे अनेक चित्रपट आले. फराह नाजचे बहुसंख्य चित्रपट हिट ठरले.
फराह नाज एक वादग्रस्त अभिनेत्री
फराह नाजने एका जु्न्या मुलाखतीत तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. याच मुलाखतीत तिने चंकी पांडेसोबत झालेल्या एका वादाबद्दल सांगितलं होतं. 1989 साली एका चित्रपटाची शूटिंग चालू होते. या चित्रपटात फराह नाजसोबत चंकी पांडे होता. यावेळी चंगी पांडेने फराह नाजसोबत थट्टा केली. ही मस्करी फराहला अजिबात आवडली नाही. त्यामुळे रागाच्या भरात फराहने चंकी पांडेच्या थेट कानशीलात लगावली. त्यानंतर चंकी पांडेने फराहची माफीदेखील मागितली होती. 1989 सालीच फराहचा रखवाला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र तो फ्लॉप ठरला.
अनिल कपूरसोबतही झाला होता वाद
फराह नाज आणि अनिल कपूर यांच्यातही एकदा चांगलाच वाद झाला होता. हे दोघेही एका पार्टीमध्ये गेले होते. या दोघांचा एक चित्रपट फ्लॉप ठरला होता. पार्टी चालू असताना अनिल कपूर एका व्यक्तीसोबत बोलत होता. यावेळी फराहच्या जागेवर माधुरी दीक्षितला घेतलं असतं तर चित्रपट हिट ठरला असता, असं त्या व्यक्तीने सांगिलं. हा संवाद फराहने ऐकला होता. त्यानंतर फराहने अनिल कपूरसोबत कोणताही चित्रपट करणार नाही, असं ठरवलं होतं, अशी आठवण फराह नाजने सांगितली.
फराह नाज सध्या काय करते?
फराह नाजने 1996 साली दारा सिंह यांचा मुलगा विंदु दारा सिंह यांच्यासोबत प्रेमविवाह केला. या दोघांना फतेह रंधावा नावाचा एक मुलगा आहे. फराहने 2002 साली विंदु दारा सिंगसोबत तलाक घेतला. त्यानंतर 2003 साली फराहने सुमित साईगलसोबत लग्न केलं. सुमित आणि फराह आजही सोबत आहेत.
हेही वाचा :
Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला