मुंबई : बॉलिवुड विश्वात अशा अनेक प्रेमकहाण्या आहेत, ज्या यशस्वी राहिलेल्या आहेत. म्हणजेच अनेक कलाकारांनी आपल्या आवडीच्या जोडीदारासोबत लग्न केलेलं आहे. पण याच सिनेजगतात अशा काही लव्हस्टोरीज आहेत, ज्या अधुऱ्याच राहिल्या. अनेक प्रयत्न करूनही चित्रपट सृष्टीमध्ये काही जोडीदार कधीच एकत्र आले नाहीत. यात रणजित आणि सिंपल कपाडिया यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. विशेष म्हणजे तेव्हाचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळख असलेल्या राजेश खन्नाने या प्रेमकहाणीत मिठाचा खडा टाकला होता. राजेश खान्ना यांनी थेट व्हिलनची भूमिका निभावली होती.
सिंपल कपाडिया-रणजित यांचा एकमेकांवर जीव जडला पण...
बॉलीवुडमध्ये 70 च्या दशकात खलनायकाची भूमिका साकारणारे अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले. त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे खऱ्या विश्वातही अनेकजण त्यांना घबरत असत. मात्र बॉलिवुडमध्ये काम करणारी अभिनेत्री सिंपल कपाडिया अशी अभिनेत्री होती, जी चक्क व्हिलनचं काम करणाऱ्या रणजित या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती. हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेमक करायचे. मात्र त्यांची प्रेमकहाणी पूर्ण होऊ शकली नाही. सिंपल कपाडिया ही डिंपल कपाडियाची बहीण आहे. तर डिंपल कपाडिया ही राजेश खान्ना यांची पत्नी आहे.
राजेश खन्ना यांना रणजित आवडायचे नाहीत
सिंपल कपाड़िया रणजित यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. रणजित यांच्या अभिनयापासून ते त्यांच्या हेअरस्टाईलपर्यंत सर्वकाही सिपल यांना आवडलं होतं. राजेश खन्ना यांना मात्र त्याचं हे नातं मान्य नव्हतं. राजेश खन्ना यांना रणजित आवडायचे नाहीत. त्यामुळेच त्यांनी या नात्याला विरोध केला होता. परिणामी भविष्यात रणजित आणि सिंपल यांची प्रेमकहाणी पूर्ण होऊच शकली नाही.
राजेश खन्ना यांनी टाकला मिठाचा खडा
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार रणजित आणि सिंपल एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. दोघेही आपापल्या करिअरमध्ये चांगल्या स्थितीत होते. त्यांच्या डेटिंगची चर्चा सगळीकडे होत होत्या. असे असतानाच राजेश खन्ना मध्ये आले. राजेश खन्ना या नात्याच्या विरोधत होते. कारण रणजित यांच्याबाबत काही गोष्टी राजेश खन्ना यांना आवडत नसायचे. द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार छैला बाबू या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणजित आणि राजेश खन्ना यांच्यात वाद झाला होता. सिंपल कपाडिया हिच्यामुळेच या वादाला तोंड फुटले होते, असे म्हटले जाते. त्यानंतर मात्र सिंपल कपाडिया आणि रणजित यांच्या लव्हस्टोरीला ब्रेक लागला. पुढे सिंपल कपाडिया अभिनय क्षेत्रात फार काही करू शकली नाही. तिने नंतर फिल्म जगताला रामराम करून फॅशन डिझायनर म्हणून काम केले.
हेही वाचा :
Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
वर्षातला सर्वांत वादग्रस्त चित्रपट आता ओटीटीवर येणार, जाणून घ्या नेमका कुठे आणि कधी पाहता येणार?