मुंबई : मराठी रंगभूमी मोठ समृद्ध आहे. कलाकारांनी आतापर्यंत मराठी रसिकांना अनेक दर्जेदार नाटक दिलेले आहेत. कसलेल्या अभिनेत्यांमुळे काही नाटकं तर अजरामर झाली आहेत. महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा आहे. हीच परंपरा आज अनेकजण पुढे घेऊन जात आहेत. दरम्यान, सध्या पुरुष या नाटकाचे प्रयोग चालू आहेत. या प्रयोगादरम्यान एक अजब प्रकार घडला आहे. नाटक चालू असताना दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे चक्क संवाद विसरल्याची घटना घडली. त्यानंतर हा प्रयोग रद्द करण्यात आला.
नेमकं काय घडलं?
पुरुष या नाटकाच्या प्रयोगादरम्यान शरद पोंक्षे संवाद विसरले. हा प्रसंग श्रुती आगाशे हिने सांगितला आहे. या प्रसंगाचा अनुभव तिने एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. नाटकाचा प्रयोग चालू असताना शरद पोंक्षे चक्क संवाद विसरले. त्यानंतर त्यांनी प्रेक्षकांना थोडा वेळ मागितला. नंतर प्रयोग रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
मला थोडा वेळ द्याल का?
श्रुती आगाशे हिच्या सांगण्यांनुसार संवाद विसरल्यानंतर 'रसिकहो मी ब्लँक झालो आहे. मला काहीच आठवत नाहीये. मला थोडा वेळ द्याल का?' अशी विचारणा शरद पोंक्षे यांनी केली. त्यानंतर प्रेक्षकांनीही कोणतेही आढेवेढे न देता पोंक्षे यांच्या विनंतीला मान देत टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंत काही वेळाने हा प्रयोग रद्द झाल्याचं सांगण्यात आलं.
शरद पोंक्षे यांना भावना अनावर
पुढे प्रेक्षकांच्या आग्रहानंतर शरद पोक्षे हे मंचावर आले आणि त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी रसिकांची संवाध साधताना शरद पोंक्षे यांना भावना अनावर झाल्या. त्यांना रडू कोसळलं. माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत असं पहिल्यांदाच झालं, असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे प्रेक्षकांनीही कोणतीही तक्रार न करता प्रयोग रद्द झाल्याचं समजल्यानंतर नाटकाच्या संपूर्ण टीमला पुढील प्रयोगासाठी शुभेच्छा दिल्या. कोणतीही तक्रार केली नाही.
शरद पोंक्षे प्रेक्षाकांशी संवाद साधत होते तेव्हा त्यांचामुलगा स्नेह पोंक्षे हादेखील त्यांच्या बाजूला उभा होता. दरम्यान, या प्रसंगानंतर महाराष्ट्रात नाटक या कलाकृतीसंदर्भात लोकांना किती आदर आहे. तसेच राज्यातील प्रेक्षकवर्ग किती संवेदनशील, जागृत आणि कलाकारांचा मान ठेवणारा आहे, हे पुन्हा एकदा यातून सिद्ध झाल्याचं म्हटलं जातंय.
स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणारं नाटक
पुरूष हे नाटक 40 वर्षांनंतर रंगभूमीवर आलं आहे. नाटककार जयवंत दळवी यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. स्त्री-पुरष संबंधांवर भाष्य करणारं हे नाटक आहे. पुरुषप्रधान मानसिकतेवर या नाटकात भाष्य करण्यात आलेलं आहे. शरद पोंक्षे या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत.
हेही वाचा :
वर्षातला सर्वांत वादग्रस्त चित्रपट आता ओटीटीवर येणार, जाणून घ्या नेमका कुठे आणि कधी पाहता येणार?