Sushant Singh Rajput Death Anniversary: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 14 जून म्हणजेच आजच्या दिवशी एक वर्ष पूर्ण होत आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतनं राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या प्रथम स्मृतीदिनाच्या एक दिवस आधी त्यानं संपादन केलेलं यश आणि त्याचा प्रवास अधोरेखित करणारी एक वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. www.ImmortalSushant.com अशी ही वेबसाईट आहे. 


सुशांतसाठी खास तयार करण्यात आलेल्या या वेबसाईटवर त्याच्या कलाविश्वातील प्रवासासोबतच इतर आवडीनिवडी, त्याचे प्रयत्न, विविध ट्रेंड्स याबाबत माहिती मिळणार आहे. सुशांतची छायाचित्र आणि त्याच्या काही मुलाखतीही या माध्यमातून चाहत्यांना पाहता येणार आहेत. हे वेबसाईट निर्मितीसाठी सुशांतच्या कुटुंबीयांनीही समर्थन दिलं आहे. 


वर्षभरापूर्वी केलेली आत्महत्या.... 
सुशांत सिंह राजपूत यानं वर्षभरापूर्वी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. मुंबई पोलिसांशिवाय या आत्महत्येच्या तपासासाठी बिहार पोलीस, सीबीआयही पुढं आली. यानंतर सदर प्रकरणी अनेक धागेदोरे मिळत गेल्यामुळं ईडी आणि एनसीबी या यंत्रणांनीही त्यांच्या परिनं याचा तपास सुरु केला होता. ज्यामध्ये सुशांतची कथित प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचीही चौकशी करण्यात आली होती. सुशांतच्या कुटुंबीयांकडून रियावर काही गंभीर आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. वर्षभरानंतरही या प्रकणारची चर्चा सुरुच आहे. 


SSR Case : मुंबई पोलिसांना सुशांतच्या एडीआर तपासात काहीच संशायस्पद आढळलं नाही, तपास थांबवण्याच्या विचारात यंत्रणा


'सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, वर्ष उलटलं तरी तपास पूर्ण का नाही?' उषा नाडकर्णी यांचा उद्विग्न सवाल
'सुशांत स्वप्न बघणारा मुलगा होता. अवघ्या 23-24 वर्षांचा तो मुलगा मोठी स्वप्न घेऊन आला होता. मालिकांमधून सिनेमामध्ये गेला. तिथेही त्याला चांगले सिनेमे मिळाले. त्याला जे हवं ते सगळं मिळत होतं. शिवाय त्याचे त्यानंतर काय करायचं याचे प्लॅनही होते. असं असणारा सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. मला खात्रीनं वाटतं त्याला मारलं गेलं असणार.', अशा थेट शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी सुशांतबद्दलच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.