Web Series Review Vaazha Movie: सध्या हॉरर (Horror Movie), सस्पेन्स-थ्रीलर सिनेमाची (Suspense-Thriller Cinema) क्रेझ सतत वाढतेय. ओटीटी (OTT) लवर्सकडे खूप पर्याय आहेत. अशातच कोणीही घरबसल्या आपल्या आवडीचे सिनेमे (Movies) आणि सीरिज (Web Series) पाहू शकतात. वेब सीरिजसोबतच काही सिनेमांचा सस्पेन्स हैराण करणारा असतो. आजकाल, हॉरर आणि सस्पेन्स जॉनरचे चित्रपट कॉमेडी चित्रपटांवर वर्चस्व गाजवत आहेत. विशेषतः मैत्रीची कहाणी दाखवणारे चित्रपट खूप पसंत केले जातात. आज आपण अशा चित्रपटाबद्दल बोलत आहोत ज्याचा क्लायमॅक्स तुम्हाला पूर्णपणे हादरवून टाकू शकतो.

Continues below advertisement


मित्रांची कहाणी उलगडतो 'हा' सिनेमा 


आम्ही ज्या सिनेमाबाबत सांगतोय, तो काही बालिश मुलांची कहाणी दाखवतो. चित्रपटात भांडणं देखील आहेत. यासोबतच, हा सिनेमा तुम्हाला जीवन जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देखील देतो.


जर तुम्हाला अंदाज आला नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या सिनेमाचं नाव 'वाजा- बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज' आहे. गेल्या वर्षी हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला नाही, ते ओटीटीवर या सिनेमाचा आनंद घेऊ शकतात.



'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे फिल्म 


'वाझा- बायोपिक ऑफ ए बिलियन बॉईज'चा उल्लेख ओटीटी लवर्समध्ये नेहमीच सुरू असते. तुम्ही घरबसल्या हा सिनेमा पाहू शकता. ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत बोलायचं तर, हा सिनेमा तुम्ही जियो हॉटस्टारवर पाहू शकता.                                                                   


दरम्यान, चित्रपट प्रेमींना माहीत आहे की, कोणताही चित्रपट त्याच्या कथेसाठी, डायलॉग्जसाठी आणि अॅक्टिंगसाठी लक्षात ठेवला जातो. 'वाझा - बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज'चा क्लायमॅक्स पाहून तुम्ही पुरते हादरुन जाल. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल किंवा चुकवला असेल, तर तुम्ही आठवड्याच्या शेवटी किंवा वेळ मिळेल तेव्हा जियो हॉटस्टारवर पाहू शकता. या हिट चित्रपटाला IMDb वर 7.3 रेटिंग मिळालं आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून हा सिनेमा नक्की पाहा. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bollywood Movie Nana Patekar: 'या' फिल्ममध्ये नाना पाटेकरांनी साकारलेली सायको पतीची भूमिका, पत्नीचा करायचा छळ, 4 कोटींच्या फिल्मनं कमावलेले 31 कोटी