Bollywood Movie Nana Patekar Played Psycho Husband Role: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) असे अनेक अभिनेते आहेत, जे आपल्या वर्सेटाईल अभिनयासाठी ओळखले जातात. त्यापैकी एक नाव म्हणजे, नाना पाटेकर (Nana Patekar). या बहुगुणी अभिनेत्यानं रंगभूमीपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रुपेरी पडदाही गाजवला. बॉलिवूड (Bollywood) आणि मराठी सिनेमांमधून (Marathi Cinema) आपल्या अभिनयाचा ठसा नाना पाटेकरांनी रसिक-प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. सिनेमा कोणताही असो कॉमेडी किंवा क्राईम-थ्रीलर (Crime Thriller Movie) नानांच्या अभिनयाला तोड नसतेच. एखादा वेगळ्या धाटणीचा सिनेमात तर नाना पाटेकरांना अभिनय आणखी उभारुन येतो. 

Continues below advertisement

'वेलकम' सिनेमातला उदय शेट्टी असो वा तिरंगा सिनेमातला शिवाजीराव वागळे... नाना नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवतात. नाना पाटेकरांनी रुपेरी पडद्यावर खलनायकही फार उत्तमपणे साकारला आहे. आज आम्ही तुम्हाला नाना पाटेकरांच्या अशाच एका सिनेमाबाबत सांगणार आहोत, ज्या सिनेमात त्यांनी अशा पतीची भूमिका साकारली होती, ज्यानं त्याच्या पत्नीला अक्षरशः सळो की पळो करुन सोडलेलं. नानांनी या सिनेमात मनोरुग्ण पतीची भूमिका उत्तम साकारली आहे. हा सिनेमा त्या काळातल्या सुपरडुपर हिट सिनेमांपैकी एक होता. 

नाना पाटेकरांचा हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नाव 'अग्निसाक्षी'. ज्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच वर्षी जुही चावलाचा चित्रपटही त्याच थीमवर प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव होतं 'दरार'. समान कथा असलेले दोन चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित झाले, तरीसुद्धा नाना पाटेकरांच्या 'अग्निसाक्षी'वर याचा अजिबात परिणाम झाला नाही. उत्कृष्ट अभिनय आणि उत्तम दिग्दर्शनामुळे या चित्रपटानं 31 कोटी रुपये कमावले. तर हा चित्रपट फक्त 4 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला होता. नाना पाटेकरांव्यतिरिक्त, मनीषा कोईराला आणि जॅकी श्रॉफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.

Continues below advertisement

'अग्निसाक्षी'मध्ये सायको पतीची भूमिका साकारलेली 

नाना पाटेकरांनी 'अग्निसाक्षी'मध्ये सायको पतीची भूमिका साकारलेली. नाना पाटेकर आपल्या पत्नीबद्दल खूप पझेसिव्ह आहे. त्याला आपल्या पत्नीनं डान्स करणं किंवा बाजारात भाजी आणायला जाणंही आवडायचं नाही. एवढंच काय तर, जर एखादी अनोळखी व्यक्ती त्याच्या पतीशी बोलली, तर त्याचा पारा चढायचा. तो सगळा राग पत्नीवर काढायचा. तिच्यावर अत्याचार करायचा. त्यानंतर तो त्या अनोळखी व्यक्तीलाही सोडायचा नाही, त्या व्यक्तीलाही त्रास द्यायचा. या सिनेमात मनीषा कोईरालानं नाना पाटेकरांच्या पत्नीची भूमिका साकारलेली. सायको पतीच्या त्रासाला कंटाळून मनीषा कोईराला तिथून पळून जाते आणि आपली ओळख लपवून राहू लागते. नंतर ती जॅकी श्रॉफशी लग्न करते. पण, तिचा सायको पती तिला शोधून काढतोच, तो तिला सहजासहजी सोडत नाही. तिचा मागोवा घेत तो तिच्यापर्यंत पोहोचतोच. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ना शाहरुख, ना टॉम क्रूज, 'हा' जगातील सर्वात श्रीमंत स्थलांतरित अभिनेता; ज्याचं नेट वर्थ ₹1,00,00,00,00,000