Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सार्वजनिक ठिकाणी गेला की चाहत्यांचा गराडा असतो... एका फोटोसाठी अथवा सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी होतेच. अनेकदा गर्दीला थोपवण्यासाठी बॉडीगार्डला हस्तक्षेप करावा लागतो. पण प्रत्येकवेळा अशीच परिस्थिती असेल असं नाही. अनेकदा यामुळे रणबीर कपूर ट्रोलही झाला.. आता रणबीर कपूरचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रणबीर कपूर त्याच्यासोबत सेल्फी काढणाऱ्याचा मोबाईल फोन फेकून देतो.. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोलही केलेय. पण रणबीरने फोन का फेकला? असा प्रश्न उपस्थित होतो... 


 नेमकं काय झालं ? 
रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. यामध्ये एक चाहता रणबीरसोबत सेल्फी काढत असल्याचं दिसत आहे.. पण अनेकदा प्रयत्न केल्यानंतरही त्याला व्यवस्थित सेल्फी काढता येत नाही. दोन ते तीन वेळा असं झाल्यानंतर रणबीर कपूरला राग अनावर होतो... त्यामुळे तो तरुणाच्या हातून फोन घेतो अन् फेकून देतो.






 रणबीर नेमकं असं का केलं ?


व्हिडीओमागील सत्य काय आहे? हे जाणून न घेता नेटकरी कमेंट्स करत आहेत. एका युजर्सने म्हटलेय की,' आणखी करा बॉलिवूडला सपोर्ट....' दुसऱ्या एका युजर्से म्हटलेय की, 'बरोबर केले... इतके का फोटो काढले.' लोकांना माहित नाही, की हे लोकं किती घंमड करतात.. तरीही लोक त्यांच्या पाठीमागे असतात.. असे एका युजर्सनं म्हटलेय. तर एका युजर्सने म्हटलेय... आणखी करा यांना फोलो.. तर काही नेटकऱ्यांनी म्हटले की, हा जाहिरातीचा अथवा प्रमोशनचा फंडा आहे... तर अन्य एका युजर्सने म्हटले की, ही जाहिरात आहे ही... ज्यामुळे रणबीरला लोक ट्रोल करत आहेत.  ट्वीटरवर सध्या #angryranbirkapoor हा ट्रेंड सुरु आहे. #angryranbirkapoor हा हॅशटॅग वापरुन नेटकऱ्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत.