War 2 Trailer Out: यशराज फिल्म्सचा (Yash Raj Films) 'स्पाय युनिव्हर्स' हा भारतातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक. त्याच्या शेवटच्या पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठी कमाई केली आहे. आता 'वॉर 2' (War 2) या स्पाय युनिव्हर्सला पुढे नेण्यासाठी आला आहे, ज्यामध्ये हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर (N. T. Rama Rao Jr.) सारखे सुपरस्टार आहेत.
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' या आगामी अॅक्शन चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, प्रेक्षक त्याबद्दल उत्सुक आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास फक्त तीन आठवडे बाकी आहेत आणि आता त्याचा बहुप्रतिक्षित अद्भुत ट्रेलर शुक्रवार, 25 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये दोन सुपरस्टार हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील भयंकर भांडणं पाहून चाहते वेडे झाले आहेत. 'वॉर 2' चा ट्रेलर खरोखरच जबरदस्त आहे, ज्यामध्ये जोरदार अॅक्शन, रोमान्स आणि हृतिक, रोशन यांच्यातील टक्कर पाहायला मिळेल.
'वॉर 2' ट्रेलर रिलीज
'वॉर 2'चा ट्रेलर रिलीज झाला असून हृतिक रोशन पुन्हा एकदा कबीरच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे. ज्युनियर एनटीआर देखील हृतिकपेक्षा कमी दिसत नाही. ट्रेलरमध्ये एका भयंकर युद्धाची झलक दिसते, जी वायआरएफ स्पाई यूनिवर्सचा स्केल आणखी वाढवते. हाय-स्पीड चेसपासून ते स्फोटक अॅक्शन सीन्सपर्यंत, 'वॉर 2'चा ट्रेलर अॅक्शन प्रेमी आणि फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी एक उत्तम भेट आहे.
कसा आहे 'वॉर 2'चा ट्रेलर?
ट्रेलरच्या सुरुवातीला, डोक्याला दुखापत झालेला हृतिक रोशन पडद्यावर दिसतो. त्यानंतर त्याचा आवाज ऐकू येतो आणि तो म्हणतो की, मी शपथ घेतो की, मी माझं नाव, घर आणि कुटुंब सोडून एक सावली बनेन, एक अनामिक, निनावी अज्ञात सावली. यानंतर, ज्युनियर एनटीआरची दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे, तो म्हणतो की, मी शपथ घेतो की, मी ते करेन जे दुसरं कोणीही करू शकत नाही. मी अशी लढाई लढेन जी दुसरं कोणीही लढू शकत नाही. यादरम्यान, ज्युनियर एनटीआर त्याच्या सिक्स पॅकचा अभिमान बाळगताना दिसतो. यानंतर, ट्रेलरमध्ये हृतिक आणि कियारा अडवाणीची रोमँटिक केमिस्ट्री देखील दाखवण्यात आली आहे.
त्यासोबतच हृतिक पुढे म्हणतो की, प्रत्येक सहकारी, प्रत्येक मित्र आणि मी कधीकाळी प्रेम केलेल्या प्रत्येक चेहऱ्यापासून दूर जाईन आणि कधीही मागे वळून पाहणार नाही. त्यानंतर ज्युनियर एनटीआरचा आवाज येतो, जो म्हणतो की, तो पाप आणि पुण्यची प्रत्येक ओळ पुसून टाकेल. ट्रेलरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआरमधील फेसऑफ अद्भुत आहे. दोघांचेही हाय लेवल अॅक्शन सीन्स तुमचं मन हेलावून टाकतात. ट्रेलरच्या शेवटी, आशुतोष राणा भगवद्गीतेतील श्लोक वाचताना दिसतो आणि आठवण करून देतो की, तुम्ही एक सैनिक आहात आणि हे एक युद्ध आहे.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :