Weekly Horoscope 28 July To 3 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा काहीसा खास असणार आहे. कारण श्रावण मासारंभाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान अनेक सण उत्सव साजरे केले जातील. तसेच, या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्यामुळे नवीन आठवडा तूळ ते धनु राशीसाठी कसा राहील? यासाठी नवीन आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या नात्यात सुधारणा झालेली दिसेल. तसेच, आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चढ-उतारांचा सामना करावा लागेल. खर्चात अचानक वाढ होईल. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन मित्रांशी भेटीगाठी होतील. तसेच, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तसेच, तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट होईल जोडीदाराबरोबर चांगला व्यवहार राहील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा फार चांगला असणार आहे. व्यावसायिक लोकांसाठी ही स्थिती फार चांगली असेल. तसेच, आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला काम मिळेल. वरिष्ठांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार चांगला असणार आहे. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. काही वस्तूंचं दानही कराल. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. नोकरीत तुमची चांगली प्रगती झालेली दिसेल. मित्रांबरोबर चांगले संबंध निर्माण होतील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनेक गोष्टींचा लाभ घेता येईल. तसेच, तुमच्या आरोग्यात हळुहळू सुधारणा झालेली दिसेल. काही मानसिक समस्या देखील तुम्हाला जाणवतील.
मात्र, नियमित योग, व्यायाम केल्याने तुम्हाला चांगला फरक जाणवेल. नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा फार सामान्य असणार आहे. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टींचा लाभ घ्याल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)