Vishal Thakkar Missing: बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक कलाकार असतात जे काही काळ चित्रपटांमध्ये दिसून येतात आणि नंतर अचानक गायब होतात. असाच एक कलाकार आहे विशाल ठक्कर (Vishal Thakkar Missing). 2003 मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट "मुन्नाभाई एमबीबीएस" (Munnabhai MBBS) मध्ये त्याने एक महत्वाची भूमिका साकारली होती, पण आजकाल तो अनेक वर्षांपासून बेपत्ता आहे. त्याचे वृद्ध आई-वडील अजूनही त्याच्या सुरक्षित परतीची आस ठेवत आहेत. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नेमकं काय घडलं?  

Continues below advertisement

Vishal Thakkar Missing: अभिनय कारकिर्दीची सुरुवात

विशाल ठक्करने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2001 मध्ये तब्बूच्या 'चांदणी बार' या चित्रपटातून केली. मात्र त्याला ओळख मिळाली ती 2003 मध्ये आलेल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातून, ज्यात त्याने एका तरुणाची भूमिका केली होती जो गर्लफ्रेंड सोडून गेल्यावर आत्महत्येचे विचार करत होता. या चित्रपटात 'मुन्नाभाई’ (संजय दत्त) त्याला जीवनाचे महत्त्व समजावतो. या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात त्याचं स्थान निर्माण केलं. पुढे तो 'टँगो चार्ली', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'किस देश में है मेरा दिल' अशा काही टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसला.

Vishal Thakkar Missing: वैयक्तिक आयुष्यातील संकट

विशाल ठक्करचा वैयक्तिक जीवन प्रवास मात्र सुखद नव्हता. तो लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता, पण त्याचे त्याच्या गर्लफ्रेंडशी सतत वाद होत होते. त्याच्या आईच्या मते, गर्लफ्रेंड खूप रागीट आणि भांडणं करणारी होती. एकदा एवढा वाद वाढला की त्याच्या गर्लफ्रेंडने पोलिसांकडे तक्रार केली, ज्यामुळे विशालला अटकही झाली. जरी ही तक्रार नंतर मागे घेतली गेली, तरी या घटनेने विशालच्या मनावर गंभीर परिणाम केला आणि तो नैराश्यात जावू लागला होता.

Continues below advertisement

Vishal Thakkar Missing: आरोपानंतर अचानक बेपत्ता

2015 मध्ये विशालवर बलात्काराचा गंभीर आरोप लागला. त्यानंतर, 31 डिसेंबर 2015 रोजी तो न्यू इयर सेलिब्रेशनसाठी बाहेर गेला. त्याने आईकडून 500 रुपये घेतले आणि मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी निघाला. दुपारी फेसबुकवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, तर रात्री 1 वाजता वडिलांना मेसेज करून मित्रांसोबत असल्याचे सांगितले. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपल्या मैत्रिणीला शूटिंगसाठी जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर विशालला मुंबईतील घोडबंदर परिसरात एका रिक्षामध्ये बसताना शेवटचे पाहिले गेले.

Vishal Thakkar Missing: गर्लफ्रेंडचाही संशयास्पद मृत्यू

6 जानेवारी 2016 रोजी त्याच्या पालकांनी पोलिसांकडे तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. या प्रकरणात त्याच्या गर्लफ्रेंडचा कट असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला, पण पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. विशालचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. दोन वर्षांनंतर, त्याची गर्लफ्रेंड मृतावस्थेत आढळली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता.

Vishal Thakkar Missing: आजही पालकांच्या मनात आशा

विशाल ठक्करचं काय झालं, तो नेमका कुठे गेला? याबाबत अजूनही काहीच माहिती नाही. त्याचे वृद्ध आई-वडील अजूनही त्याच्या परतीची आस बाळगत आहेत. बॉलिवूडच्या या कलाकाराच्या अचानक बेपत्ता होण्याने अनेकांना धक्का दिला आहे. 

आणखी वाचा 

अक्षय कुमारला दिलासा! महर्षी वाल्मिकींच्या वेशातल्या डीपफेक व्हिडीओवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्देश