Viral Video : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटची (Alia Bhatt) प्रमुख भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी  या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमधील आलियाच्या डॅशिंग स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेक लोक आलियाच्या अभिनयाचं आणि लूकचं कौतुक करत आहेत. आता गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील आलियाच्या लूकसारखा लूक करून एका चिमुकलीनं खास व्हिडीओ शेअर केला आहे. 


व्हिडीओमध्ये ही चिमुकली मुलगी  गंगूबाई काठियावाडी  या चित्रपटातील आलियाचे डायलॉग्स म्हणताना दिसत आहे.  नाकात नथ, लाल रंगाची बिंदी आणि पांढऱ्या रंगाची साडी असा लूक या मुलीने केला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करून या मुलीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. शिवानी जे खन्ना या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  18 हजारपेक्षा जास्त लाइक्स या व्हिडीओला मिळाले असून 27 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.  
 
पाहा व्हिडीओ-






 गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाची रिलीज डेट 18 फेब्रुवारी 2022 निश्चित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्याची रिलीज डेट पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते. अखेर 25 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha