Vikrant Massey On Son Vardaan Religion: 'बारावी फेल' (12th Fail), 'सेक्टर 36' (Sector 36) या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेला विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) यानं सध्या इंडस्ट्रीमधून काही वेळासाठी ब्रेक घेतला आहे. तसेच, तो आपला मुलाला आणि पत्नीला वेळ देत आहे. अशातच सध्या विक्रांत मेस्सी चर्चेत आला आहे. याचं कारण त्याचं प्रोफेशनल लाईफ नाहीतर पर्सनल लाईफ आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी विक्रांतनं शीतल ठाकूरसोबत आपली लग्नगाठ बांधली. त्यानंतर गेल्या वर्षीच म्हणजेच, 2024 मध्ये दोघांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. अभिनेत्यानं आपल्या मुलाचं नाव वरदान (Vardan) ठेवलंय. 

काही दिवसांपूर्वीच विक्रांत मेस्सीनं स्पष्ट केलेलं की, तो आपल्या मुलाला पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं वाढवणार आहे. विक्रांत आणि शीतलने त्याच्या बर्थ सर्टिफिकेटवर त्यांच्या मुलाचा धर्म लिहिलेला नाही. नुकताच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये विक्रांत मेस्सी आला होता. त्यावेळी बोलताना विक्रांत मेस्सीनं याबाबत सांगितलं. विक्रांत मेस्सी म्हणाला की, "धर्म ही वैयक्तिक निवड आहे. जीवन जगण्याचा हा माझा एक मार्ग आहे."

विक्रांत मेस्सी म्हणाला की, "मला वाटतंय की, प्रत्येकाला त्यांचा धर्म निवडण्याचा अधिकार असला पाहिजे. माझ्या घरात तुम्हाला प्रत्येक धर्माचे लोक सापडतील. माझा असा विश्वास आहे की, धर्म मानवांनी निर्माण केला आहे. मी पूजा करतो, मी गुरुद्वारा, दर्ग्यातही जातो. या सर्व गोष्टींमुळे मला शांती मिळते. विक्रांत म्हणाला की, माझा मुलगा कोणत्याही धार्मिक लेबल आणि भेदभावाशिवाय मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे."

आम्ही मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर धर्माचा कॉलम रिकामा ठेवला : विक्रांत मेस्सी 

जेव्हा तो मोठा होईल आणि सर्व गोष्टी त्याला समजू लागतील, तेव्हा तो स्वतःच निवड करेल, असंही विक्रांत मेस्सी म्हणाला. अभिनेत्यानं पुढे बोलताना सांगितलं की, आम्ही मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर धर्माचा कॉलम रिकामा ठेवला आहे. म्हणून जेव्हा त्याचं बर्थ सर्टिफिकेट आलं, तेव्हा त्यावर धर्म लिहिलेला नव्हता. 

विक्रांत मेस्सी पुढे म्हणाला की, "जर मला कळलं की, माझा मुलगा एखाद्या व्यक्तीसोबत त्याच्या वागण्यावरून वागतोय, तर मला खूप वाईट वाटेल. कारण मी माझ्या मुलाला असं वाढवत नाहीये. विक्रांत अशा कुटुंबातील आहे, जिथे लोक धर्म आणि जात मानत नाहीत. अभिनेत्याचे वडील ख्रिश्चन, आई शीख आणि मोठा भाऊ मुस्लिम आहे."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Hera Pheri 3 Star Cast Fees: अक्षय कुमार, परेश रावल अन् सुनील शेट्टीनं 'हेरा फेरी 3'साठी किती मानधन घेतलं?