Horoscope Today 2 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 2 जुलै 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीविठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज हाडाची दुखणे डोके वर काढतील, कलाकारांच्या कलांची आणि कार्यशक्तीची कुचंबना होईल  

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज बरोबरीचे लोक पुढे जातील, परंतु तुम्ही थोडे मागे पडल्यामुळे निराश व्हाल     

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज महिलांच्या गुणांची कदर होणार नाही, कोणत्याही संघर्षाला तयार राहाल  

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज कोणतेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय न घेतलेलेच बरे, परंतु पैशाची वाढलेली कामे मात्र पार पडतील      

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो कोणत्याही कामांमध्ये मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्रांचा उपयोग होणार आहे 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज मोठ्या भावनांची साथ लागेल, वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी कामे पार पडणार नाहीत     

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज कुटुंबात थोडा ताण-तणाव जाणवला तरी, प्रेमपूर्वक वातावरणात सर्व ताण विरून जातील     

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज थोडासा अहंकार आज बाजूला ठेवायला हवा, नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घ्या     

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, वैवाहिक जीवनात ऍडजेस्टमेंट करावी लागेल   

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो प्रवासाचे योग येतील, प्रवासात इतरांशी वादविवाद टाळावे लागतील         

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज सर्व प्रकारच्या वृत्तीना लगाम घालावा लागेल, समज गैरसमज आणि समजूतदारपणाच्या कक्षा रुंदवाव्या लागतील  

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज विचारांची परिपक्वता अनुभवानं वाढवावी लागेल, जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात गेलात तर उत्साह वाढेल

हेही वाचा :                          

Monthly Horoscope July 2025: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जुलै महिना कसा जाणार? कोणाच्या नशीबाचं दार उघडणार? मासिक राशीभविष्य वाचा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)