मुंबई :  पहिला लॉकडाऊन (Lockdown)  उठला तेव्हाची गोष्ट होती. अनलॉकिंग होण्याची सुरूवात झाली होती. पण निर्बंध असतानाच तिकडे दक्षिणेत एक सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाचं नाव होतं मास्टर. यात थलपती विजय आणि विजय सेतूपती (vijay sethupathi) असे दोन तगडे कलकार आमने सामने भिडले होते. थलपती विजय होता नायक आणि विजय सेतूपती खलनायक. हा सिनेमा तुफान गाजला. अनलॉक पूर्ण निघाला नसतानाही दक्षिणेत लोकांनी तोबा गर्दी करून हा सिनेमा पाहिला. ही गर्दी इतकी झाली की त्या गर्दीच्या बातम्या झाल्या. थलपती विजय हा प्रसिद्ध आहेच. पण मास्टरने विजय सेतूपतीला नवी ओळख मिळाली. तो दक्षिणेसह संपूर्ण भारतात लोकप्रिय झाला. 


विजय सेतूपती हा उत्तम कलाकार आहे हे लोकांच्या लक्षात आलं. आता हिंदीचे अनेक लोक त्याच्या माने धावू लागले आहेत. असं असलं तरी त्याहीपेक्षा वेबसीरीजवाले आता विजयच्या मागे आहेत. त्यांना विजय सेतूपती फार महत्वाचा वाटू लागला आहे. म्हणूनच आता फॅमिली मॅन 3 ची तयारी सुरू असतानाच त्यातल्या महत्वाच्या भूमिकेसाठी विजय सेतूपती याचं नाव आलं आहे. अनेकांना माहीत नसेल, पण फॅमिली मॅनच्या (Family Man) दुसऱ्या सीझनसााठी विजयला विचारणा झाली होती. त्यात श्रीलंकन गटनेत्याची भूमिका त्याला देऊ करायची होती. पण काही कारणामुळे ही भूमिका विजयने नाकारली. त्यानंतर मास्टर रिलीज झाला. आता पुन्हा एकदा फॅमिली मॅनचे निर्माते, दिग्दर्शक विजयकडे गेले आहेत. आता नव्या तिसऱ्या सीझनमध्ये विजयने यावं यासाठी त्यांनी विजयशी संपर्क साधला आहे. 


विजयने ही भूमिका करण्याबद्दल अजून काहीच वाच्यता केलेली नाही. किंबहुना फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनमध्ये विजयला विचारणा झाली आहे याबद्दलही कोणी अधिकृत काहीच बोलायला तयार नाही. पण मिळालेल्या माहीतीनुसार आता मनोज वाजयेयीच्या समोर विजयने उभं राहावं अशी निर्मात्यांची इच्छा आहे. विजय सेतूपती आणि मनोज वाजपेयी यांच्यात क्लायमॅक्सला होणारा संघर्ष पाहाणं ही पाहणाऱ्यांसाठी पर्वणी असणार आहे. फॅमिली मॅनचं हे तिसरं कथानक थ्रेट एनालिसीस एंट सर्विलंन्स टीम आणि चायनीज मिलिट्री यांच्याभवती फिरणार असल्याचं कळतं. आता विजय सेतूपती नव्याने आलेली ही ऑफर स्वीकारतो का ते पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


फॅमिली मॅनचे दोन्ही सीझन गाजले. पहिल्या सीझननंतर दुसरा सीझन कसा होईल याकडे लोकांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण दुसऱ्या सीझनचंही स्वागत लोकांनी जोरदार केलं. यात सुरूवातीच्या काळात फॅमिली मॅन 2 ही वेबसीरीज प्रसारित करूच नये यासाठी तामिळनाडू सरकारने दबाव आणला होता. त्यांनी केंद्राला पत्र लिहून ही बाब कळवली होती. पण तरुणाईने अतिशय उत्साहाने या वेबसीरीजचं स्वागत केलं. 


संबंधित बातम्या :