Vijay Deverakonda on Rashmika : काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika mandanna)रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लवकरचे ते साखरपुडा उरकणार आहेत, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याबाबत आता विजय देवरकोंडानेच (Vijay Deverakonda) भाष्य केलं आहे. "मी फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार नाही किंवा माझा साखरपुडाही नाही. मला वाटतय मीडियाला दर दोन वर्षांनी माझे लग्न लावायचे आहे. अशा अफवा मी दरवर्षी ऐकतो. ते माझ्या जवळून जातात. मी कधी लग्न करतो, हेच त्यांना पाहायचे आहे.", असे विजय देवरकोंडा म्हणाला. Lifestyle Asia ला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.
रश्मिका मंदाना आणि विजयच्या डेटिंगच्या चर्चा (Vijay Deverakonda)
दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये रश्मिका आणि विजय एकत्रित वेळ घालवताना पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये विजय देवरकोंडा फार आनंदी दिसत होता. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) रश्मिकासोबत सुट्ट्या एंजॉय करत असल्याच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या. एका चाहत्याने लिहिल होते की, विजय देवरकोंडाच्या चेहऱ्यावरिल हास्यामागे रश्मिका मंदाना (Rashmika mandanna) आहे.
रश्मिकाची पुष्पा 2 मधील पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक
रश्मिकाचा 'अॅनिमल' या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरुच आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमातही ती दिसणार आहे. पुष्पा 2 ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा 2 मधील रश्मिकाची (Rashmika mandanna) पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच रेनबो, द गर्लफ्रेंड आणि चावा हे तिचे आगामी सिनेमे आहेत. दुसरीकडे विजयचे (Vijay Deverakonda) 'फॅमिली स्टार' 'वीडी 12' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. तसेच त्यांच्या आगामी सिनेमांसह चाहत्यांना उत्सुकता आहे. मकर सक्रांती दिवशी रश्मिका मंदानाने लाल कलरच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या