Vidya Balan : अभिनेत्रींना इंटिमेट सीन करताना बरेच अनुभव येत असतात. अनेकदा ते सीन प्रेक्षकांनी पाहिल्यावर त्यांच्यारकडून येणाऱ्या प्रतिक्रियाही अभिनेत्रींसाठी (Actress) अनुभव देण्याऱ्या ठरतात. अनेकदा अशा प्रकारचे सीन करताना अभिनेत्रींना सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं होतं. असाच बॉलीवूडमधील (Bollywood) एका अभिनेत्रीला अनुभव आला आहे. पण तिचा हा अनुभव काहीसा मजेशीर होता. 


अभिनेत्री विद्या बालन ही सध्या दोन और दो प्यार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रतीक गांधी देखील दिसणार आहे. हा चित्रपट 19 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात विद्याने प्रतीक गांधीसोबत काही इंटिमेट सीन्स केले आहेत. 


अभिनेत्रीने सांगितला मजेशीर अनुभव


विद्या बालनने फ्री प्रेस जनरल या चित्रपटाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या चित्रपटातील रोमँटीक सीन शूट करतानाचे अनुभव सांगितले आहेत. यावर बोलताना तिनं म्हटलं की, असे सीन करताना मी आधू खूप हसते. ते हसणंच मला असे सीन्स करण्यासाठी रिलॅक्स्ड करतं. त्यामुळे मला असे सीन करताना अवघडल्यासारखं होण्यापेक्षा मी खूप हसते. 


हसणं आम्हाला अशावेळी रिलॅक्स्ड करतं - विद्या बालन


बऱ्याचदा आमच्या पात्रांमुळे आम्ही प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असतो. पण आम्हाला सर्वात जास्त हसू हे इंटिमेट सीन्स करताना येतं. पण असहाय्य होणारं हे हास्य मला ते सीन्स करताना रिलॅक्स्ड करतं. ज्याप्रकारे या चित्रपटाची गोष्ट लिहिण्यात आली आहे, ती अप्रतिम आहे. 


बॉडीशेमिंगवर विद्या बालनची प्रतिक्रिया


दरम्यान काही दिवसांपूर्वी विद्या बालनने बॉडी शेमिंगविषयी देखील भाष्य केलं होतं. यावर बोलताना तिनं म्हटलं की, 'स्वत:वर प्रेम करायला मला आवडतं. बॉडी शेमिंगची शिकार झाली असून आता मात्र मी स्वत:कडे जास्तीत जास्त लक्ष देते. मी माझ्या पतीसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते. मी काय कपडे परिधान करायचे हा माझा प्रश्न आहे. मी कधीच लोकांचा विचार करत नाही.'


विद्याच्या 'दो और दो प्यार'ची प्रेक्षकांना  उत्सुकता


प्रतीक गांधी आणि विद्या बालन पहिल्यांदाच 'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात इलियाना डिक्रूज आणि सेनडिल रामामूर्तीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिरशा गुहा ठाकुरताने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


ही बातमी वाचा : 


Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राचा सेटवर अपघात, अमेरिकेतील चित्रीकरणा दरम्यानची घटना, पाहा फोटो