Vicky Kaushal, Katrina Kaif : अनेक वेळा काही युझर्स सेलिब्रिटींना सोशल मीडियावर स्टॉक करतात. आता एका व्यक्तीनं अभिनेत्री कतरिना कैफला (Katrina Kaif) स्टॉक केल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता विकी कौशलनं (Vicku Kaushal) सांताक्रूझ (Santacruz) पोलीस स्टेशनमध्ये या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विकीची पत्नी कतरिना कैफला एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टॉक करत होता. या व्यक्तीच्या विरोधात विकीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 


काय आहे प्रकरण? 
विकीची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफला आदित्य राजपूत नावाचा एक मुलगा सोशल मीडियावर स्टॉक करत होता. आदित्यला विकीने उत्तर देताच त्यानं विकीला धमकी द्यायला सुरूवात केली. त्यानंतर विकीनं सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये आदित्यच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


विकी-कतरिनाचे आगामी चित्रपट


कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सिक्स सेन्स फोर्ट, बरवारा, सवाई माधोपूर येथे लग्न केले होते. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच 'फोन भूत' या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत दिसणार आहे, हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर विकीचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफनं गेल्या सहा महिन्यात आशियातील सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आलेल्या सेलिब्रीटींच्या यादीत सातव्या स्थान मिळलं. अनेक नेटकरी कतरिनाच्या सोशल मीडियावरील पोस्टवर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. 


हेही वाचा: