Vicky Kaushal, Akshaye Khanna First Meet: बहुप्रतिक्षित 'छावा' (Chhaava Movie) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच, 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवशी हा ऐतिहासिक चित्रपट देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता चाहते या चित्रपटासाठी एक्सायटेड असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाबाबत एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये असलेल्या दोन स्टार्सनी शुटिंगपूर्वी एकमेकांचा चेहराही पाहिला नव्हता. ते एकमेकांच्या समोर आले ते थेट छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) अन् औरंगजेब (Aurangzeb) म्हणूनच. पण त्या दोघांनी असं का केलं? याचं कारण हैराण करणारं आहे.
'छावा' चित्रपटात विक्की कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लेडी सुपरस्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसुबाईंच्या (Maharani Yesubai) भूमिकेत झळकणार आहे. तर, मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (Akshaye Khanna) दिसणार आहे. पण, विक्की कौशल आणि अक्षय खन्ना सेटवर ना भेटले, ना ते एकमेकांशी बोलले. ते एकमेकांसमोर आले ते थेट छत्रपती संभाजी महाराज अन् औरंगजेबाच्या वेशात. पण, त्यांनी असं का केलं? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.
'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी सांगितलं की, "विक्की आणि अक्षय सीन शूट करण्यापूर्वी एकमेकांना भेटलेच नाहीत. ना त्यांनी याबाबत कोणतीही चर्चा केली. तो पहिला दिवस होता, जेव्हा दोघे सेटवर आपल्या-आपल्या भूमिकेच्या गेटअपमध्ये आले. पण, त्यापूर्वी त्यांनी सीनबाबत किंवा इतर गोष्टींबाबत कोणतीही चर्चा केली नाही."
तो औरंगजेब होता अन् मी छत्रपती संभाजी महाराज...
विक्की कौशलनं याबाबत बोलताना सांगितलं की, "जेव्हा आम्ही सीन शूट करत होतो, त्यावेळी आम्ही एकमेकांना नाही गुडबाय म्हटलं, नाही हॅलो... माझ्यासाठी तो औरंगजेब होता आणि त्याच्यासाठी मी छत्रपती संभाजी महाराज. आमची भेट सेटवर सीनच्या दरम्यान झाली. आमचा म्हणजेच, विक्की कौशल आणि अक्षय खन्ना म्हणून एकमेकांशी कोणतंच इंटरेक्शन झालं नाही."
...म्हणून केलं सर्वकाही
विक्की कौशलनं सांगितलं की, "ज्या प्रकारचा आमचा सीन होता, तो एकमेकांच्या बाजूला बसून, सतत एकमेकांशी बोलून, चिटचॅट करुन अजिबात करता आला नसता. जे हावभाव, जो ऑरा हवा होता, तो दिसला नसता. त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलणं टाळलं. त्यामुळे अपेक्षा आहे की, फिल्म रिलीज झाल्यानंतर एकमेकांसोबत बसू आणि एकमेकांसोबत बोलण्याची संधी मिळेल. कारण शूटच्या दरम्यान तर अजिबात एकमेकांशी बोलणं झालेलं नाही."
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले की, "दोघांनीही एकमेकांशी बोलण्यास नकार दिला होता. दोघेही त्यांच्या पात्रांमध्ये इतके बुडून गेले. त्यांना माझं तोंडही पहायचं नव्हतं.
दरम्यान, 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये विकी कौशल संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे, तर रश्मिका मंदाना त्यांच्या पत्नी महाराणी येसुबाईंची भूमिका साकारत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :