Ramesh Deo Demise: मराठी चित्रपट सृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असणारे अभिनेते (Actor) रमेश देव (Ramesh Deo) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. मराठी चित्रपट सृष्टीच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टी गाजवलेल्या रमेश देव यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक चित्रपट गाजवलेल्या रमेश देव यांच्यासोबत रुपेरी पडद्यासह खऱ्या जीवनातही त्यांची खंबीर साथ दिली ती म्हणजे त्यांची पत्नी सीमा देव (Seema Deo) यांनी. वयाची तब्बल 59 वर्षें या दोघांनीही एकत्र संसार केला. अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकत्र झळकलेले हे दोघेही विशेष म्हणजे अधिक हिंदी चित्रपटात एकत्र दिसले आहेत. पण मराठी चित्रपटांमध्ये कपल असणारे हे दोघे हिंदी सिनेमांत अनेकदा वेगवेगळ्या भूमिकांत दिसून आले.
पण इतक्या भूमिकांमध्ये एकत्र काम करणाऱ्या या दोघांची पहिला सिनेमा 1960 साली प्रदर्शित झाला होता. 'जगाच्या पाठीवर' या सिनेमात सर्वात पहिल्यांदा दोघे एकत्र रुपेरी पडद्यावर झळकले. रमेश देव यांनी 1950 च्या सुमारास अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. तर सीमा देव यांचा जगाच्या पाठीवर हा पहिलाच सिनेमा होता. खरं नाव नलिनी सराफ असणाऱ्या सीमा यांनी चित्रपटांत येताना त्याचं नाव 'सीमा' असं नाव ठेवलं. त्यानंतर पहिल्याच सिनेमांत रमेश देव यांच्यासोबत झळकलेल्या सीमा यांचा हा चित्रपट तुफान हिट झाला.
अनेक चित्रपट हिट
या जोडीचा पहिला चित्रपट हीट झाल्यानंतर दोघांनी मिळून अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. याती काही चित्रपटांनातर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. यातील 1962 सालचा‘वरदक्षिणा’ हा चित्रपट देखील एक ब्लॉकबस्टर ठरला. याच चित्रपटात दोघांचे बंध जुळले. ज्यानंतर 1 जुलै, 1963 रोजी हे दोघेही विवाह बंधनात अडकले. 2013 मध्ये लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करताना रमेश यांनी त्यांची पत्नी सीमासोबतची केमिस्ट्री कमाल होती, त्यामुळे ते एकत्र सिनेमांत काम करताना अगदी नैसर्गिक आणि रिअल वाटायचं असं रमेश म्हणाले.
59 वर्षांचा सुखी संसार
रमेश आणि सीमा यांचं 1963 मध्ये लग्न झाल्यानंतर रमेश यांच्या निधनापर्यंत दोघांनीही 59 वर्षे सुखी संसार केला. या दोघानांही दोन मुलं असून यातील एक म्हणजे अजिंक्य देव आणि एक अभिनय देव. अजिंक्य हे एक प्रसिद्ध नट असून हिंदी, मराठी चित्रपटांसह सिरीयलमध्येही त्यांनी अनेक भूमिका साकरल्या आहेत. तर अभिनय हा दिग्दर्शक असून तो कथा-पटकथा देखील लिहितो. प्रसिद्ध सिनेमा दिल्ली-बेल्लीचं दिग्दर्शन त्यानेच केलं आहे.
रमेश देव एक अष्टपैलू कलाकार
रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनामुळं फिल्मी दुनियेतील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त कऱण्यात येत आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक राजबिंडं व्यक्तिमत्व अशी रमेश देव यांची ओळख होती. पाटलाचं पोर, सुवासिनी, झेप, अपराध, सर्जा, या सुखांनो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, तीन बहुरानियाँ असे त्यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. कोल्हापुरात 30 जानेवारी 1929 मध्ये रमेश देव यांचा जन्म झाला. देव कुटुंबीय मूळचे राजस्थानचे आहेत. पण रमेश देव यांचे वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते. शाहू महाराजांमुळे त्यांचं आडनाव देव असं पडलं होतं. 'पाटलाचं पोर' सिनेमातून रमेश देव यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 'आंधळा मागतो एक डोळा' हा देव यांचा पहिला मराठी चित्रपट होता आणि राजश्री प्रॉडक्शनचा 'आरती' हा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यांची 'आनंद' सिनेमातली भूमिका प्रचंड गाजली. भिंगरी, एक धागा सुखाचा, जगाच्या पाठीवर, यंदा कर्तव्य आहे या मराठी सिनेमांमधलं काम ही त्यांचं चर्चेत होतं. आपकी कसम, मेरे अपने, खिलौना, रामपूर का लक्ष्मण, बीस साल पहले, गीता मेरा नाम, घायल हे त्यांचे प्रचंड गाजलेले चित्रपट होते. 300 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
संबंधित बातम्या