Vanita Kharat Mehndi Photo : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच वनिताच्या मेहंदी सोहळ्याचा (Vanita Kharat Mehndi) कार्यक्रम पार पडला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी वनिताच्या मेहंदी सोहळ्यात हजेरी लावली होती. 


वनिताने मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना तिने 'मेहंदी' असं कॅप्शन दिलं आहे. मेहंदी सोहळ्यातील वनिता आणि सुमितच्या रोमॅंटिक फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मेहंदी सोहळ्यातील वनिताचा ड्रेस खूपच हटके आहे. सध्या सोशल मीडियावर वनिताच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो व्हायरल होत आहेत. 






'या' दिवशी वनिता अडकणार लग्नबंधनात! (Vanita Kharat Wedding Date) 


वनिताच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील स्किटमध्येही वनिताच्या लग्नाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे वनिता कधी लग्न करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. तर येत्या 2 फेब्रुवारीला वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) लग्नबंधनात (Vanita Kharat Sumit Londhe Wedding) अडकणार आहे. 


वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे कोण आहे? (Who Is Sumit Londhe) : 


वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. त्याला फिरण्याची आवड आहे. वनिताने सुमितसोबतचे अनेक फोटोदेखील शेअर केले आहेत. दोघांचेही फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. आता चाहत्यांना फक्त त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे. 


वनिता खरात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपूर्वी वनिता न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. अनेकांनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं. तर दुसरीकडे अभिनेत्रीवर प्रचंड टीका झाली. पण आता सध्या ती खाजगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. वनिता अनेक सुमित सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वनिता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Vanita Kharat: 'कवेत तुझ्या...'; वनिताच्या प्री-वेडिंग फोटोशूटची चर्चा, फोटोनं वेधलं अनेकांचे लक्ष