Latur Nagarparishad Nagarpanchayat Election Results 2025 : लातूर जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एका नगरपंचायत निवडणुकीत एक गोष्ट ठळकपणे समोर आली. यात सत्ताधारी आपापसात भिडले, पण सत्ता मात्र सत्ताधाऱ्यांकडेच राहिली. या लढतीत पारंपरिक विरोधक काँग्रेस मात्र प्रभावी ठरू शकली नाही आणि याचे थेट पडसाद आता येणाऱ्या लातूर महानगरपालिका निवडणुकीवर उमटणार आहेत. लातूर जिल्ह्यातील (Latur District Nagar Parishad Election 2025 Results) निकालांनी राजकीय समीकरणं बदलली. ती नेमकी कशी? हे जाणून घेऊ. (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025)

Continues below advertisement

Election Result 2025 : निकालांनी राजकीय समीकरणं बदलली, महानगरपालिका निवडणुकीवर थेट परिणाम?

विजयानंतर निलंगामध्ये भाजप कार्यकर्त्यात प्रचंड जल्लोष दिसून आला. उदगीर अहमदपूर आणि रेणापुरातील भाजपच विनर ठरली. निलंग्यात भाजप–काँग्रेस थेट लढतीत भाजपाने सरशी साधली. रेणापूरमध्येही भाजपाने काँग्रेसवर मात करत नगराध्यक्ष पदासह बहुमत मिळवलं. तर अहमदपूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अटीतटीचा सामना झाला, मात्र सत्ता विभागली गेली. औशामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने बहुमतासह नगराध्यक्ष पद पटकावलं, उरुळीची जागा भाजप आणि शिंदे शिवसेनेनं ताब्यात घेतल्या तर काँग्रेस इथे पूर्णपणे अपयशी ठरली. उदगीरमध्ये भाजप–राष्ट्रवादी युतीने 40 पैकी 33 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली.

Continues below advertisement

Latur District Election 2025 Results : सत्ताधाऱ्यांकडून नियोजनबद्ध ताकद, काँग्रेसमुक्त लातूर करण्याचा भाजप आणि राष्ट्रवादीचा निर्धार

या निवडणुकांत सत्ताधाऱ्यांकडून नियोजनबद्ध ताकद मैदानात उतरली. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, मंत्री बाबासाहेब पाटील आणि माजी मंत्री आणि आमदार संजय बनसोडे हे सगळेच नेते सक्रिय होते. त्याउलट काँग्रेसचा लढा आमदार अमित देशमुख यांच्या एकट्याच्या खांद्यावर सीमित राहिल्याचं चित्र दिसलं. या विजयाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी आता थेट लातूर महानगरपालिकेला आव्हान दिलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येऊन लातूर जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. सत्ताधाऱ्यांची दिशा ठरलेली आहे, तयारी स्पष्ट आहे. तर आता प्रश्न इतकाच की, महानगरपालिकेत काँग्रेस प्रतिकार उभा करू शकणार का? का येथेही पुन्हा सत्ताधारीचे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

लातूर

विभाग - मराठवाडाजिल्हा - लातूरएकूण नगर परिषद - ०४एकूण नगर पंचायत - ०१

नगर परिषद - औसा एकूण जागा – २३नगरसेवक कल/निकालभाजप - ०६शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - १७काँग्रेस -ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर –----------

नगर परिषद - उदगीरएकूण जागा – ४०नगरसेवक कल/निकालभाजप - १३शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - २०काँग्रेस - ०५ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर – ०२----------

नगर परिषद - निलंगाएकूण जागा – २३नगरसेवक कल/निकालभाजप - १५शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - काँग्रेस - ०८ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर –----------

नगर परिषद - अहमदपूरएकूण जागा – २५नगरसेवक कल/निकालभाजप - ०३शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - १६काँग्रेस -ठाकरेंची शिवसेना - ०३शरद पवार राष्ट्रवादी - ०३इतर –----------

नगर पंचायत - रेणापूरएकूण जागा – १७नगरसेवक कल/निकालभाजप - १०शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - काँग्रेस - ०५ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी - ०१इतर – ०१----------

जिल्हा - लातूरजिल्ह्यातील एकूण नगराध्यक्षपदं – ०५भाजप - ०४शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - ०१काँग्रेस -ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर –--------

ही बातमी वाचा:

Sunil Shelke : माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंनी शड्डू ठोकला? म्हणाले, प्रत्येकाची महत्वाकांक्षा...