Uorfi Javed : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली उर्फी जावेद आता एका नव्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तिच्या समोर एक तरुण गुडघ्यावर बसून तिच्या बोटात अंगठी घालतोय. हे फोटो पाहून उर्फी जावेदने गुपचूप साखरपुडा उरकला का? असे विचारले जात आहे. 

 

उर्फीचा खरंच साखरपुडा झाला? 


 

उर्फी जवेदचे फोटो पाहून तिने साखरपुडा केल्याचे म्हटले जात आहे. या फोटोत उर्फी जावेद एका तरुणासमोर उभी असल्याचे दिसत आहे. तर हा तरुण गुडघ्यावर बसून तिच्या बोटात अंगठी घालताना दिसतोय. विशेष म्हणजे या फोटोमध्ये चांगला मंडप सजवण्यात आल्याचं दिसत आहे. हे फोटो पाहून तिच्याा चाहत्यांनी तिल भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. नेटकरी तिच्यासमोर असलेल्या तरुणाचा इंटरनेटवर शोध घेत आहेत. हा तरुण नेमका कोण आहे? असेही विचारले जात आहे.  

 

उर्फीच्या व्हायरल झालेल्या फोटोंमागचं सत्य काय? 


 

उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर नुकतेच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिला एक तरुण अंगठी घालताना दिसतोय. हा फोटो पोस्ट करताना 'ये इश्क नहीं आसान बस इतना समझ लिजिये धोके का खतरा है, रोका करके जाना है,' असं तिने म्हटलंय. सोबतच तिने एंगेज्ड रोका या धोका असा हॅशटॅग दिला आहे. तिचे हे कॅप्शन पाहून उर्फीच्या पोस्टचा नेमक अर्थ समोर आला आहे. एंगेज्ड रोका या धोका हा कार्यक्रम येत्या 14 फेब्रुवारीपासून डिज्नी + हॉटस्टार या ओटीटी चॅनेलवर येणार आहे. याच कार्यक्रमाचा प्रचार म्हणून तिने ही पोस्ट केली आहे. 





उर्फीला अंगठी घालणारा तरुण कोण आहे?


या शोमध्ये एकूण 10 तरुण-तरुणी एकत्र राहणार आहेत. हे सर्वजण 240 तास सोबत रहणार आहेत. या काळात तरुण-तरुणी एकमेकांसाठी पुरक आहेत का, त्यांच्यात चांगला संवाद होतोय का, ते एकमेकांसाठी किती तडजोड करू शकतात, याची चाचपणी केली जाईल. हा शो उर्फी जावेद होस्ट करणार आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून उर्फी जावेदला तरुण अंगठी घालताना दिसतोय. विशेष म्हणजे हा तरुण दुसरा तिसर कोणी नसून कॉमेडियन हर्ष गुजराल आहे. हर्ष गुजराल आणि उर्फी जावेद दोघेही एकत्र हा शो होस्ट करणार आहेत.


हेही वाचा :


'जयश्री आय लव्ह यू....' अंगावर लाल कोट, काळा गॉगल अन् गुडघ्यावर बसून दिला गुलाब; गुणरत्न सदावर्तेंचं जयश्री पाटलांना फिल्मी स्टाईल प्रपोज!


Yesha Sagar : पाहुण्यांसोबत जेवायला बसली नाही म्हणून फ्रेंचाइजी मालकाने नोटीस बजावली, मॉडेल-अँकर येशा सागरसोबत बांगलादेशमध्ये काय घडलं?


बिग बॉसमध्ये झळकलेली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री घेणार होती संन्यास, पण 'या' कारणामुळे घेतलं एक पाऊल मागे!