Uorfi Javed : उर्फी जावेद (Uorfi Javed ) ही तिच्या अनेक कारणांमुळे चर्चेत असते. तिचा फॅशन लूक तर सोशल मीडियावर आकर्षणाचं कारण आहे. तिचे पब्लिसिटी स्टंट तर जगप्रसिद्ध आहेत. यातून उर्फी बरेच पैसे कमवते, असं अनेकजण म्हणतात. पण तरीही उर्फी सध्या नोकरीच्या शोधात असल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या कोणी नाही तर स्वत: उर्फीने याबाब माहिती दिली आहे. इतकच नव्हे तर तिने तिचा बायोडेटा तिच्या सोशल मीडियावरही शेअर केलाय.
उर्फी जावेद हे नाव घेतलं तरी आता हिने काहीतरी वेगळंच केलं असणार असा अनेकांचा समज झाला आहे. पोलिसांनी पकडून घेऊन जाणं असो किंवा तिचा ड्रेसिंग सेन्स असो, या सगळ्यामुळे उर्फीला बऱ्याचदा ट्रोलिंगल सामोरं जावं लागत आहे. त्यातच आता तिच्या नोकरीच्या पोस्टने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
उर्फीने शेअर केला बायोडेटा
उर्फीने तिच्या सोशल मीडियावर बायोडेटा शेअर करत म्हटलं की, रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्यास तयार!!! होय, मी नोकरी शोधत आहे. मी 31 वर्षांच्या अगदी जवळ आहे आणि माझा फॅशन प्रभाव धोक्यात आहे. सध्या मला माझ्या भुकेल्या पोटाची काळजी घ्यायची आहे.माझ्यासाठी तीच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सध्या माझ्यासाठी हाच एक उत्तम पर्याय आहे. तुमच्याकडे काहीही लिड्स असतील तर मला नक्की कळवा आणि मला 31 मे आधी नोकरी शोधण्यासाठी मदत करा. (तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल, तर कृपया @Myntra ला सांगा की तुमचा एंड ऑफ रिझन विकू नका).”
उर्फीच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स
उर्फीच्या या पोस्टवर अनेकांनी फार मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. यावेळी अनेकांनी तिला नोकरीसाठी संपर्क कसा साधायचा असा प्रश्न विचारला. त्यावर उर्फीनेही भन्नाट उत्तर दिलं आहे. यावर उर्फीने म्हटलं की, जर मी तुमचं ट्रोलिंग हाताळू शकते तर तुमचे कॉल्स देखील हातालऊ शकते. तसेच अनेकांनी उर्फीला नोकरीच्या ऑफरही दिल्या आहेत. तर काहींनी नेहमीप्रमाणे तिच्या पोस्टची खिल्ली उडवली आहे.
उर्फी बिग बॉस ओटीटीमुळे चर्चेत
उर्फीने तिच्या करिअरची सुरुवात मालिकेतून केली. मेरी दुर्गा, सात फेरो की हेरा फेरी, कसौटी जिंदगी की आणि इतर अनेक मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाल्यानंतर उर्फी प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या फॅशन सेन्समुळे ती चर्चेत असते. तिच्या पोस्टवर अनेकदा तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. पण याचा उर्फीवर कधीच कोणता परिणाम होत नाही आणि ती प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी तिच्या विचित्र आऊटफिटमध्ये दिसते.