Twinkle Khanna On Physical Infidelity: अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सध्या चर्चेत आहे. ट्विंकल आणि काजोल त्यांच्या 'टू मच' (Too Much) या टॉक शोमुळे चर्चेत आहेत. शोच्या नव्या भागात करण जोहर आणि जान्हवी कपूर आलेले. त्यावेळी चौघांनी शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही प्रकारच्या 'बेवफाई'वर चर्चा केली. चौघांपैकी कुणी सहमत होता, तर कुणी असहमत. जान्हवी ही एकमेव अशी व्यक्ती होती, जी 'फिजिकल बेवफाई' म्हणजे ब्रेकअप, असं मानत होती. तर काजोल, ट्विंकल आणि करण जोहर हे तिघे म्हणाले की, ते अशा चुकीकडे दुर्लक्ष करू शकतात.
ट्विंकल खन्ना जे म्हणाली, ते... (Twinkle Khanna On Physical Infidelity in Too Much Show)
'टू मच' शोमध्ये 'दिस ऑर दॅट' नावाचा एक भाग आहे. या भागात, पाहुणे आणि होस्ट यांना एक प्रश्न दिला जातो आणि प्रत्येकजण त्या प्रश्नावर त्यांचं मत देतो. या विभागात पहिला प्रश्न होता की लग्नासाठी प्रेम आवश्यक आहे की, फक्त सुसंगतता... उत्तर देताना, ट्विंकल खन्ना आणि जान्हवी कपूर यांनी असा युक्तिवाद केला की, प्रेम आवश्यक आहे, तर काजोल आणि करण जोहर यांचा असा विश्वास होता की,असं काही नाही...
काजोल म्हणाली की, प्रेम ताळमेळाशिवाय टिकू शकत नाही. ती म्हणाली, "जर तुमच्यात पुरेसा ताळमेळ नसेल, तर लग्नानंतर प्रेम ही पहिली गोष्ट मरते..." करण तिच्याशी सहमत झाला आणि म्हणाला की, कधीतरी तुम्हाला प्रेमाव्यतिरिक्त इतर गोष्टींचा विचार करावा लागेल.
पुढचा प्रश्न होता: 'फिजिकल बेवफाई'पेक्षा 'इमोशनल बेवफाई' जास्त गंभीर आहे का? यावेळी, जान्हवी एकटी पडली आणि इतर तिघेही 'इमोशनल बेवफाई' हा मोठा गुन्हा आहे, असं म्हटलं. करण म्हणाला की, "फिजिकल बेवफाई ही नातं तोडणारी गोष्ट नाही..." ज्यावर जान्हवीनं उत्तर दिले, "नाही, नातं तुटतं..." पण, यामध्ये ट्विंकल पुढे म्हणाली की, "आपण 50 च्या दशकात आहोत. ती 20 च्या दशकात आहे. आणि ती लवकरच या सर्कलमध्ये येईल... आपण जे पाहिलं ते तिनं पाहिलेलं नाही. रात गई बात गई..."
ट्विंकल होतेय ट्रोल (Twinkle Troll Over Her Statement)
ट्विंकल खन्ना तिच्या वक्तव्यामुळे ट्रोल होतेय. तिचं वक्तव्य व्हायरल झालंय आणि युजर्स तिच्याशी अजिबात सहमत नाहीत. एका युजरनं कमेंट केलीय की, "मग लग्नाचा काय अर्थ आहे? जर तुम्ही विश्वासू राहू शकत नसाल तर..." दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "कदाचित त्यांच्या कुटुंबात हे सामान्य आहे..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "कदाचित बॉलिवूडच्या पत्नींकडे दुसरा पर्याय नसावा..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "तुम्ही कोणत्या मूर्खपणाबद्दल बोलत आहात?"
दरम्यान, ट्विंकल खन्नानं 2001 मध्ये अभिनेता अक्षय कुमारशी लग्न केलेलं, तर काजोलनं 1999 मध्ये अभिनेता अजय देवगणशी लग्न केलेलं. ट्विंकलशी लग्न करण्यापूर्वी अक्षय कुमारचं अभिनेत्री रवीना टंडनशी लग्न झालेलं. त्याचं शिल्पा शेट्टीशीही नातं होतं, ज्याची खूप चर्चा झाली. अक्षयची इंडस्ट्रीमध्ये प्लेबॉय इमेज होती. 'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडमध्ये ट्विंकलनं उघड केलंय की, ती अक्षयसोबतच्या नात्याबद्दल सुरुवातीला अजिबात सीरिअस नव्हती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :