Zee Cine Awards 2023 : विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाला गेल्या वर्षी जगभरातून प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. हा चित्रपट रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झालं तरीही चित्रपटाची उत्कृष्ट फिल्मोग्राफी आणि पात्रांच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाला एका सामाजिक संस्थेकडून सन्मानित करण्यात आलं. यावेळी पुन्हा, 'द कश्मीर फाइल्स' ने झी सिने अवॉर्ड्स 2023 (Zee Cine Awards 2023) मध्ये चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट पटकथा', 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' आणि 'नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार जिंकले आहेत. 


चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी हे पुरस्कार स्विकारले. आणि ते 40 वर्षीय काश्मिरी पंडित संजय शर्मा यांना समर्पित केले. पंडित संजय शर्मा यांना पुलवामा येथे स्थानिक बाजारपेठेत जात असताना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. या सोहळ्या संबंधित अनेक फोटो विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.  






विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, पीपल्स फिल्म #TheKashmirFiles ने #ZeeCineAwards2023 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नकारात्मक भूमिकेचे पुरस्कार जिंकले आहेत. आम्ही हा पुरस्कार शहीद संजय शर्मा यांना समर्पित करतो ज्यांनी काश्मीरमध्ये धार्मिक दहशतवादाला बलिदान दिलं. ."


'द कश्मीर फाइल्स'चा बोलबाला कायम


विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमावर प्रचंड टीका झाली होती. पण तरीही वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्ल्वी जोशी मुख्य भूमिकेत होते. या सिनेमत काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटणांचे वर्णन करण्यात आले होते. भारतात या सिनेमाने 252.90 कोटींची कमाई केली होती. तर जगभरात या सिनेमाने 340.92 कोटींची कमाई केली आहे. 


 


महत्त्वाच्या बातम्या : 


Prakash Raj: 'द कश्मीर फाइल्स'नं दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावल्यानंतर प्रकाश राज यांचे ट्वीट; म्हणाले...