Physical Assault Case Against TV Actor Ashish Kapoor: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  टिव्ही अभिनेता आशिष कपूर आणि अन्य दोन आरोपींविरोधात दाखल करण्यात आलेल्या कथित बलात्कार प्रकरणाची सुनावणी तीस हजारी न्यायालयाने पुढील कार्यवाहीसाठी सत्र न्यायालयात पाठवली आहे.  न्यायालयाने स्पष्ट केले की,  भारतीय दंड संहितेच्या कलम  64 (1) अंतर्गत बलात्काराचा गुन्हा केवळ सत्र न्यायालयात खटला चालवता येतो.  न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी कार्तिक तपारिया यांनी आरोपपत्र तसेच या प्रकरणातील सर्व नोंदी तपासल्यानंतर हा आदेश दिला आहे. सध्या या प्रकरणातील तिन्ही आरोपी जामिनीवर आहेत. 11 ऑगस्ट 2025 रोजी पीडितेने अभिनेता आशिष कपूरसह दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती.  

Continues below advertisement

तिघा आरोपींविरोधात एफआयआर दाखल

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, सिव्हिल लाइन्स पोलिसांनी 11  ऑगस्ट 2025 रोजी अभिनेते आशिष कपूर, कपिल गुप्ता आणि रितू गुप्ता  यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम  64 (1)अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.  जे बलात्कार, सामूहिक बलात्कार, हल्ला आणि इतर गंभीर गुन्ह्याशी संबंधित आहे.  तपासानंतर  दिल्ली पोलिसांनी  नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 64 (1)अंतर्गत आरोपपत्र दाखल केले, जे बलात्काराशी संबंधित आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची आणि संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर न्यायिक दंडाधिकारी  प्रथम जिल्हा  कार्तिक तपारिया यांनी खटला सत्र न्यायालयात  हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. 

न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले की, फौजदारी दंड संहितेच्या कलम 64 (1) अंतर्गत गुन्हे केवळ सत्र न्यायालयातच चालवता येतात. या आधारे, खटला सत्र न्यायालयात सोपवण्यात आला आहे.  कोर्टाने अहलमद यांना  22 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांसमोर केसची फाइल तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले. सरकारी वकिलांनाही या आदेशाची माहिती देण्यात आली आहे. 

Continues below advertisement

तिघेही आरोपी सध्या जामिनावर आहेत.  यापूर्वी जामीन मंजूर करताना न्यायालयाने पोलीस तपासातील  त्रुटींचा उल्लेख केला होता. पोलीस कोठडी असूनही  आरोपीचा मोबाईल फोन परत मिळवण्यासाठी कोणतेही  ठोस प्रयत्न केले गेले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

नेमकं प्रकरण काय?

एका पार्टीत आरोपींनी पिडीतेला ड्रग्ज देऊन बेशुद्ध केले.  नंतर बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.  आशिष कपूरला 2 सप्टेंबर 2025 रोजी  पुण्याहून अटक करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बॉर्डर 2मध्ये अक्षय खन्ना झळकणार? व्हायरल फोटोवरून चर्चांना उधाण, निर्मात्यांनी एका वाक्यात विषय संपवला