Chandrapur Election 2026 Result चंद्रपूर : चंद्रपूरमधील महापौर पद आणि महापालिकेतील काँग्रेसच्या संभाव्य सत्तेवर आपल्या नियंत्रणासाठी जरी काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar)आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) गटांमध्ये रस्सीखेच सुरू असली आणि त्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लक्ष घालावं, अशी धानोरकर गटाची अपेक्षा असली, तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आज नागपुरात येण्याची शक्यता फार कमी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) आज बुलढाण्यात असून ते लवकरच काँग्रेसच्या आंदोलनासाठी उत्तर प्रदेशात जाण्याची शक्यता आहे. तरदुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी चंद्रपूर मधील या दोन्ही दिग्गज नेत्यांची फोनवरून समजूतकाढल्याचीमाहितीआहे. दोन्ही नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अन्यथा दोन्ही नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात येईल, अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनीघेतल्याचीहीमाहितीआहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यामध्यस्थीनंतरतरी चंद्रपूरमधील वादशमेलका? हेपाहणेमहत्वाचेठरणारआहे. Chandrapur Municipal Corporation 2026 Result)
चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर होणार आणि त्याच्या शपथविधीमध्ये मी जाईल, अशी भूमिका सध्या तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे. त्यामुळे धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या संघर्षामध्ये सध्या तरी काँग्रेस प्रदेश नेतृत्वाची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचे दिसून आलं. मात्र आता हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्यक्षनजातफोनवरसंवादसाधल्याचेमाहितीआहे.
Harshwardhan Sapkal: चंद्रपूरमध्ये कुठलाही वाद नाही आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर बसणार
दरम्यानयाचमुद्यावरबोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणालेकि, चंद्रपूरमध्ये कुठलाही वाद नाही आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर बसणार. महापौर पदभार घेईल त्या दिवशी मी चंद्रपूरत असेल. वाढवन बंधारा विषयी भूमिपुत्रांची लढाई योग्य आहे. लोढांच्याच मुलाच्या कंपनीसोबत दावोसमध्ये जाऊन करार करतात. जो करार मुंबईतही होऊ शकतो, तो करार दावोसला जाऊन ते करतात. एक लाख कोटी वगैरे ही सगळी फेकमफाक असल्याचीटीका हर्षवर्धन सपकाळ यांनीकेलीय. 30 जानेवारीला जरी मुंबईत भाजपचा महापौर बसत असेल तरी या ट्रिपल इंजिन सरकारमधील युद्ध संपलेले नाही. हे टोळीयुद्ध अजूनही भडकणार आहे. असेहीतेम्हणाले.
Harshwardhan Sapkal on PM Modi : मोहम्मद गजनीने प्रमाणे खासदार मोदीजी अहिल्यादेवींचं स्मारक तोडतायत
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. बघूया निकाल काय येतो, यासोबतच शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या चिन्हावरही अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू आहे. यावेळी हे सरकार हा निकाल मॅनेज करूनच देईल. वाराणसीतीलमणिकर्णिका घाटासंबंधी लवकरच वाराणसी येथे एक आंदोलन आम्ही करत आहोत आणि त्यासाठी मी स्वतः जाणार आहे. ज्याप्रमाणे मोहम्मद गजनीने भारतात येऊन अनेक मंदिरे तोडली, त्याप्रमाणेच वाराणसीचे खासदार मोदीजी अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक तोडत आहेत. हे दुर्दैवी आहे आणि याचा आम्ही निषेध करतो असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
चंद्रपूरचा महापौर कोण होणार?
एकूण जागा - 66भाजप – 23काँग्रेस – 27काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3ठाकरेंची शिवसेना – 6वंचित - 2बसपा - 1शिवसेना – 1अपक्ष – 2एमआयएम – 1
ही बातमी वाचा:
