Hande Erçel’s Post on Shah Rukh Khan Sparks Controversy: रोमान्सचा बादशाह शाहरूख खानचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याच्या चाहत्यांचं जाळं सातासमुद्रापार पसरलं आहे. त्यानं अलिकडेच रियाध येथील जॉय अवॉर्ड्सला हजेरी लावली होती. त्यानं पुरस्कार सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुर्की अभिनेत्री हांडे एर्सेल स्टेजवर उभी राहून किंग खानचे चित्रीकरण करत असल्याचं दिसून आली होती. सोशल मीडियावर तिला शाहरूख खानची फॅन गर्ल म्हटले जात आहे. मात्र, तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून शाहरूख खानला ओळखत नसल्याचं सांगितलं. सध्या तिची पोस्ट व्हायरल होत असून, भारतीय नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, इजिप्शियन सुंदरी अमिना खलील शाहरूख खानसोबत स्टेजवर दिसत होती. हांडे एर्सेल हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करत होती. पण ती शाहरूख खानचे नसून, मैत्रीण अमिना खलीलचे फोटो शूट करत होती. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शाहरूख खान आणि अमीनाचा स्टेजवरील फोटो शेअर केला. तसेच किंग खानचा उल्लेख करत, हा काका कोण? असे कॅप्शनमध्ये लिहिले. "मी फक्त माझी मैत्रीण अमीनाचे रेकॉर्डिंग करत होते. मी त्या व्यक्तीची चाहती नाही. कृपया सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवणे थांबवा", असंही तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं.
तुर्की अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली. दरम्यान, आता हांडे एर्सेलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट डिलीट केली. किंग खानचे चाहते या पोस्टमुळे नाराज आहेत. अनेकांनी असा दावा केला की, हांडे एर्सेलची पोस्ट फेक आहे. मात्र, हांडे एर्सेलची पोस्ट खरी आहे की खोटी? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हांडे एर्सेलला बऱ्याच काळापासून बॉलिवूड सिनेसृष्टतील प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची होती. सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटाचे काही भाग तुर्कीमध्ये चित्रीत झाल्यामुळे तिला या सिनेमात कास्ट केले जाणार होते, असे वृत्त आहे. मात्र, ती या चित्रपटात दिसली नाही. भारत दौऱ्यादरम्यान, हांडे एर्सेलने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जर, तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची इतकी आवड होती, तर ती शाहरूख खानला कशी ओळखत नाही? असा सवाल आता नेटकरी उपस्थित करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'काम मिळत नसेल तर पुन्हा हिंदू धर्म स्वीकारा'; गायक अनुप जलोटांचा ए.आर रहमान यांना खोचक सल्ला