Border 2 Advance Booking Collection Day 2: सनी देओल आणि वरुण धवन यांच्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाची रिलीज डेट जसजशी जवळ येतेय, तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोमवारी सुरू झालेल्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांतच 3 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

Continues below advertisement

2026 मधील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या या वॉर ड्रामाच्या प्रदर्शनाला आता फक्त दोन दिवस उरले आहेत. सिनेमागृहात प्रदर्शित होण्याआधीच ‘बॉर्डर 2’ने अनेक मोठ्या चित्रपटांसमोर आव्हान उभं केलं आहे.

1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या पुढील भागात कथा कशी पुढे नेण्यात आली आहे, हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकिटांसाठी मोठी गर्दी होताना दिसतेय.

Continues below advertisement

रिलीजपूर्वीच 3 कोटींपेक्षा अधिकचा गल्ला 

‘बॉर्डर 2’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग 19 जानेवारी रोजी सुरू झाली होती. पहिल्या 24 तासांतच 53 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली होती आणि कमाई सुमारे 1.64 कोटींवर पोहोचली होती. दुसऱ्या दिवशीही चित्रपटाची गती कमी झाली नाही, उलट कमाईत लक्षणीय वाढ झाली.

Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, दोन दिवसांत चित्रपटाची 1 लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 8 हजार 441 तिकिटांची विक्री झाली असून अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 3.48 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. सुरुवातीला चित्रपटाला सुमारे 7 हजार शो मिळाले होते, मात्र वाढत्या मागणीमुळे आता शोची संख्या वाढवण्यात आली असून सध्या 9 हजार 309 शो उपलब्ध आहेत.

कोणत्या शहरांत जबरदस्त ओपनिंगची शक्यता?

‘बॉर्डर 2’ला डबल डिजिट ओपनिंग मिळण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये दिल्लीमध्ये आतापर्यंत 93.95 लाख रुपयांची कमाई झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये चित्रपटाने रिलीजपूर्वीच 5.52 लाखांचा व्यवसाय केला आहे. राजस्थानमध्ये 23.2 लाख, तर महाराष्ट्रात 46.26 लाख रुपयांची कमाई झाली आहे.

सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी स्टारर या वॉर ड्रामाला अजूनही रिलीजसाठी दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे प्रदर्शनाआधीच चित्रपट 7 ते 8 कोटींचा टप्पा गाठेल आणि बॉक्स ऑफिसवर 30 कोटींपेक्षा जास्तची दमदार ओपनिंग देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.