Tumbbad Box office: सोहम शाहच्या बहुचर्चित तुंबाड रिटर्नस या भयपटाची सगळीकडे चर्चा आहे. हा थरारपट १३ सप्टेंबरला पुर्नप्रक्षेपीत केला गला असून सलग तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने चित्रपटगृहात आश्चर्यकारक कामगिरी केल्याचं दिसतंय.  २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला तुंबाड सिनेमा राही अनिल बर्वे यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याच्या ट्रेंडमध्ये तु्ंबाडनं पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रवेश केला असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय. मितेश शह, प्रसाद, राही, अनिल बर्वे आणि आनंद गांधी यांनी लिहिलेल्या तुंबाडमध्ये एका गावची कथा सांगितली आहे. कोकणस्थ ब्राम्हण कुटुंबाभोवती फिरणारी कथा देवतांनी जोडलेला वडिलोपार्जित खजिना शोधतात.


बॉक्स ऑफिसवर तुंबाडचा थरार


तुंबाडने पहिल्या प्रदर्शनात जेवढी लोकप्रीयता मिळवली तीच पुर्नप्रदर्शनातही मिळाल्याचं दिसून येतंय. पुर्नप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटानं १.६५ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं जे त्याच्या मुळ प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्या दुप्पट आहे. Sacnilk मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, रि-रिलिजनंतर विकेंड कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली असून तिसऱ्या दिवशी २.६० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.


करीना कपूरच्या द बकिंगहॅम मर्डरला तुंबाडची टक्कर


तुंबाड पुर्नप्रक्षेपित केला जात असला तरी करीना कपूर खानच्या द बकिंगहॅम मर्डरसोबत तुंबाडच्या थरारपटानं चांगलीच टक्कर दिली असून रि-रिलिजनंतर तुंबाडनं तिसऱ्या दिवशी ३.२५ कोटी रुपयांची उलाढाल केली. तर द बकिंगहॅम मर्डरला २.२ कोटींवरच समाधान मानावे लागल्याचं दिसून आलं. या चित्रपटाचं आतापर्यंतचं कलेक्शन ५.३  कोटी रुपये झाले आहे.


प्रेक्षकांनी अनुभवला तुंबाडचा थरार


''समया का पाहिया गोल है, जो बीत गया वो फिर लौट के आएगा. ...दरवाजा भी एक बार फिर खुलेगा" असं म्हणत आलेला तुंबाड बॉक्स ऑफिससह प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरल्याचं दिसतंय. 13 सप्टेंबर रोजी पुन्हा प्रदर्शित झालेला तुंबाड प्रेक्षकांच्या पुनरावलोकनांसाठी खुला झाला आहे. खरं तर, तो बॉक्स ऑफिसवर एक प्रभावी कलेक्शन करू पहात आहे आणि सुरुवातीच्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा आलेख उंचीवर गेल्याचंही दिसतंय. मनोरंजन विश्वातील अनेकजण या सिनेमाला गर्दी करताना दिसत आहेत.