Trisha Krishnan spotted with Thalapathy Vijay parents: तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री थलपती विजय (Thalapathy Vijay) आणि तृषा कृष्णन यांची बरीच चर्चा रंगली. दरम्यान, आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा  पार पडला.  या ठिकाणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी  राष्ट्रीय ध्वज फडकवला.  या सोहळ्यात तृषा कृष्णन (Trisha Krishnan) देखील स्पॉट झाली.  आता या कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आला आहे.  या व्हिडीओत तृषा कृष्णन विजय थलपती यांच्या पॅरेंट्ससोबत दिसली.   हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Continues below advertisement

विजय थलपती आणि तृषा कृष्णन यांच्या नात्याची बऱ्याच महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. अलिकडेच विजय थलपती यांची पत्नी  संगीता यांनी कोर्टात घटस्फोटासाठी  केलेला अर्ज मागे घेतला आहे.  यानंतर चेंगलपट्टू कोर्टाने  हे प्रकरण बंद केले आहे. दरम्यान, आता आणखी एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं आहे.    गेल्या काही काळापासून  विजय आणि तृषा यांच्या नात्याची चर्चा होत आहे. हे दोघे अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसतात.  यापूर्वी  तृषा  थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यालाही उपस्थित होती.   

तृषा कृष्णन चेन्नईतील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात दिसली (Trisha Krishnan spotted with Thalapathy Vijay parents at Event)

पीटीआय या वृत्तसंस्थेने चेन्नईमध्ये झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा एक व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.   या व्हिडीओत  तृषा कृष्णन, विजयचे वडील एस. ए चंद्रशेखर  आणि त्यांची आई शोभा चंद्रशेखर यांच्यासोबत बसलेली दिसत आहे.  यामुळे अधिक चर्चांना उधाण आलं आहे.   या खास दिनी अभिनेत्रीने  पिवळी साडी नेसली होती.  तसेच हिरवा ब्लाऊज घातला होता.  तिने केसांचा अंबाडा बांधला होता. तसेच अंबाड्यावर गजरा माळला होता.   या सोहळ्यात तृषा प्रचंड आनंदात आणि उत्साहात दिसत आहे.

Continues below advertisement

पीटीआयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत  कॅप्शनमध्ये, 'चेन्नईमधील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला तृषा कृष्णन उपस्थित होती.  ती तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री  थलपती विजय यांच्या आई - वडिलांसोबत बसलेली  दिसत आहे'. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  थलपती विजय आणि तृषा कृष्णन हे बऱ्याच काळापासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.   दरम्यान, या चर्चांवर अद्याप दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Awarapan 3: 'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?